Join us

उर्वशी रौतेलाला या प्रसिद्ध गायकाने लग्नासाठी केले होते प्रपोज, या कारणामुळे दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 16:07 IST

आजही मिका जेव्हा जेव्हा लग्नाविषयी बोलतो तेव्हा तेव्हा उर्वशीच त्याच्या खाबों की मल्लिका असल्याचे तो नेहमीच सांगतो. 

मिका सिंग प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. त्याने जब वी मेट, हाऊसफुल, रेस 3 यांसारख्या चित्रपटात गाणी गायली असून त्याचे अनेक अल्बम गाजले आहेत. मिका सिंगचा आवाज त्यांच्या चाहत्यांवर नेहमीच भूरळ पाडतो. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी मंडळी लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. त्यामुळे  मिका सिंगलाही लग्न करण्याचे वेध लागल्याचे दिसत आहे.

 

तो सध्या अविवाहीत आहे पण काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की मिका एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. आणि तिच्याबरोबर त्याला लग्न करायचे आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे  उर्वशी रौतेला.उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाते आणि तिच्या सौंदर्याची भूरळ मिकालाही पडली. 

वयाच्या १७ व्या वर्षीच  ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेत विशेष पाहुणे म्हणून गायक मिक्का सिंगला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी रँपवर उर्वशीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहून तो अवाक् झाला. पहिल्याच नजरेत तो फुल ऑन तिच्यावर फिदा झाला.  या स्पर्धेदरम्यानच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं उर्वशीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. उर्वशी इतक्या लहान वयात लग्न कसे करेल  ती केवळ 17 वर्षांची होती. इतक्या लहान वयात लग्न होण्यास तिच्या पालकांचाही नकार होता.

 

लग्नाचा विचारही मनात नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. माझ्या चुलत भावा-बहिणींचे लग्न झाल्यानंतरच मी लग्न करणार आहे. आपलं सगळं लक्ष सध्या पूर्णपणे शिक्षण पूर्ण करणे आणि करिअरवर केंद्रीत केलं असल्याचे सांगायलाही ती विसरली नाही.  उर्वशी आणि मिकामध्ये जवळपास 17 वर्षाचे अंतर आहे. मात्र आजही मिका जेव्हा जेव्हा लग्नाविषयी बोलतो तेव्हा तेव्हा उर्वशीच त्याच्या खाबों की मल्लिका असल्याचे तो नेहमीच सांगतो. 

हे कधी, कसे झाले? काय चाहत खन्नाला डेट करतोय मिका सिंग? व्हायरल झालेत रोमॅन्टिक फोटो

लॉकडाऊनच्या काळात चाहत व मिकाचा हा फोटो समोर आल्याने सगळीकडे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. या फोटोला चाहतने ‘क्वारंटाईन लव्ह’ असे कॅप्शन दिले. चाहतनेच नाही तर मिकानेही चाहतसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले. ‘क्वारंटाईनदरम्यान घरात खूप काही करता येण्यासारखे आहे. संगीत शिका, कला शिका, पार्टनरवर प्रेम करा, आवडीचे जेवण बनवा,’ असे त्याने लिहिले.

टॅग्स :मिका सिंगउर्वशी रौतेला