Join us

मिलिंद सोमनने १८ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत साजरा केला त्याचा ५२वा वाढदिवस, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 9:59 AM

मिलिंद सोमन आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयात बरीच तफावत असून, मिलिंदने नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा ५२वा वाढदिवस साजरा केला.

काल म्हणजेच चार नोव्हेंबर रोजी मॉडेल तथा अभिनेता मिलिंद सोमनने त्याचा ५२वा वाढदिवस साजरा केला. काल दिवसभर मिलिंदवर जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. मिलिंदला त्याच्या फिटनेससाठी ओळखले जाते. तो नेहमीच लोकांमध्ये फिटनेसबाबत जनजागृती करताना दिसतो. दरम्यान, मिलिंदने त्याच्या चाहत्यांचे इन्स्टाग्राम अकाउंटवरून आभार मानताना गर्लफ्रेंड अंकिता कुंवरसोबतचे काही बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्व हितचिंतकांचे आभार आणि धन्यवाद!’आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत मिलिंद बिनधास्तपणे त्याचे फोटो शेअर करीत असतो. दोघांच्या वयात खूपच अंतर आहे, मात्र अशातही त्यांच्यातील प्रेम तसूभरही कमी नाही. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, वय केवळ एक नंबर आहे. कालच्या बर्थ डेचेदेखील मिलिंदने अंकितासोबतचे फोटो शेअर केले. दोघांनी एकत्र बर्थ डे सेलिब्रेशन केले. दरम्यान, अंकितानेही मिलिंदसोबतचे बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याच्यासाठी केवळ एक केक पुरेसा नाही. मिलिंदसोबत अंकिताचे नाते काही दिवसांपूर्वीच जुळले आहे. रिपोर्ट्सनुसार, अंकिता कुंवर पेशाने एक एअर होस्टेस आहे. मिलिंदने अंकितासोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यासोबतच्या नात्याचा उलगडा केला आहे. दोघांच्या वयात खूपच तफावत आहे. याबाबत मिलिंदने म्हटले होते की, ‘एक रिलेशनशिप दोन लोकांमध्ये असते. त्यामुळे मी कधीही वयाचा विचार केला नाही. मग ते रिलेशनशिप असो वा फिटनेस असो. मॉडेलिंग काळापासून मिलिंदवर अनेक तरुणी फिदा होत्या. मॉडेलिंग, अभिनयाबरोबर मिलिंदला त्याच्या फिटनेससाठी ओळखले जाते. आतापर्यंत त्याने जगभरातील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर त्याने ‘आयरन मॅन’ हा किताबही पटकावला आहे. मिलिंदने अखेरीस सैफ अली खानच्या ‘शेफ’ या चित्रपटात काम केले.