Join us

‘कोरोना पॉझिटीव्ह’ मिलिंद सोमणला पीपीई किट घालून भेटायला आलेली ही व्यक्ती कोण? तुम्ही ओळखलंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 5:32 PM

होय, मिलिंदवर जीवापाड प्रेम करत असलेली एक व्यक्ती अगदी फुल पीपीई किट घालून मिलिंदला भेटायला पोहोचली. साहजिकच मिलिंदची यंदाची होळी यादगार होळी ठरली.  

ठळक मुद्देमिलिंदने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली.

अभिनेता मिलिंद सोमण सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. होय, मिलिंदला कोरोनाचे निदान झाले आणि त्याने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. खरे तर कोरोनाने त्याच्या होळीच्या सणावर पूर्णपणे पाणी फेरण्याचा निश्चय केला होता. पण प्रेमापुढे कोरोनाचा हा निश्चयही फेल ठरला. होय, मिलिंदवर जीवापाड प्रेम करत असलेली एक व्यक्ती अगदी फुल पीपीई किट घालून मिलिंदला भेटायला पोहोचली. केवळ भेटायला नाही तर त्याला रंग लावायला पोहोचली.

होळीच्या निमित्ताने मिलिंदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि यात त्याच्यासोबत पीपीई किट घातलेली एक व्यक्तीही दिसतेय. ती कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेन, तर ती दुसरी तिसरी कुणी नसून मिलिंदची पत्नी अंकिता आहे.होय, मिलिंद क्वारंटाइनमध्ये होता. पण होळीसारख्या सणाला त्याला न भेटता अंकिताला राहावले नाही आणि ती चक्क पीपीई किट घालून त्याला भेटली़. सोबत आईच्या हातच्या पुरणपोळ्या आणि आंबे न्यायलाही ती विसरली नाही. साहजिकच मिलिंदची यंदाची होळी यादगार होळी ठरली.  

मिलिंदने त्याच्या पोस्टमध्ये त्याच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली. ‘क्वारंटाइनचा आजचा सातवा दिवस. अंकिता पीपीई किट आणि तोंडावर मास्क घालून मला भेटायला आली. आम्ही एकमेकांना मिठी मारू शकलो नाही. पण एकमेकांना रंगे लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. या सीझनचा पहिला आंबा आणि आईच्या हातच्या पुरणपोळीचा आस्वादही घेतला. माझ्या तोंडाची चव गेली आहे. कोणत्याही वस्तूचा वास येणेही बंद झाले आहे. याशिवाय ना डोकेदुखी आहे, ना ताप, ना अन्य लक्षणे. दिवसभर मी झोपण्याचा प्रयत्न करतो. शरीर आणि मनाला विश्रांती देणे या काळात गरजेचे आहे,’ असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. 

टॅग्स :मिलिंद सोमण