बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आता तो कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर त्याने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची इच्छा असूनही तो प्लाझ्मा डोनेट करू शकला नाही. त्याला हॉस्पिटलमधून घरी परत पाठवण्यात आले.
मिलिंद सोमण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी हॉस्पिटलला गेला होता. मात्र त्याला हॉस्पिटलने नकार दिल्यामुळे माघारी फिरावे लागले. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, 'मी आज मुंबईत प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी गेलो होतो पण अॅण्टीबॉडीज खूप कमी होत्या. आपण निरुपयोगी असल्याची भावना मनात आली.'