Join us

‘न्यूड रन’च्या त्या फोटोवर पहिल्यांदा बोलला मिलिंद सोमण, म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 5:26 PM

 फिटनेससाठी ओळखल्या जाणा-या मिलिंदने गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

ठळक मुद्देलवकरच  मिलिंद ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्ये एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मिलिंद सोमणच्या ‘न्यूड रन’वरून अलीकडे वादंग उठले होते. मिलिंद सोमणने गेल्या 4 नोव्हेंबरला आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.  फिटनेससाठी ओळखल्या जाणा-या मिलिंदने गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिने त्याची ही छबी कॅमे-यात टिपली होती. यानंतर मिलिंदने  त्याचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या न्यूड फोटोवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर खरपूस टीका झाली होती. आत्तापर्यंत मिलिंद यावर बोलला नव्हता. पण आता त्याने यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 

‘पिपिंगमून’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद यावर बोलला. नग्न म्हणजे काय? असा सवाल त्याने यावेळी केला. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून मी न्यूड फोटोशूट करतोय. याआधीही अनेकदा मी न्यूड फोटोशूट केले आहे. मी पहिल्यांदा न्यूड फोटोशूट केले, तेव्हाही चर्चेत होतो. आता गोव्यातील त्या फोटोवरूनही चर्चा सुरु आहे. फरक इतकाच की, प्रत्येकवेळी लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. नग्न व्यक्ती म्हणजे काय? माझ्या मते, देवाने आपल्याला जसे बनवले तेच. इंटरनेटवर नग्न लोकांचे चिक्कार फोटो आहे. इन्स्टाग्रामवरही अनेक न्यूड फोटो पोस्ट होत असतात. मी फक्त इतकेच म्हणेल की, प्रत्येकाचे विचार आणि स्वप्नं वेगवेगळी असतात, असे मिलिंद यावेळी म्हणाला. गोव्याच्या समुद्रकिनाºयावरील ‘न्यूड रन’प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल छेडले असता, मला याची काहीही कल्पना नसल्याचे त्याने सांगितले.  मला अद्याप याविषयीही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही,असे त्याने स्पष्ट केले.

  मिलिंद सोमण भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक आहे. मिलिंदने स्वत:पेक्षा 26 वर्षांनी लहान अंकिता कंवरसोबत लग्न केले, तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 2018 मध्ये अंकिता व मिलिंद यांनी लग्न केले,त्यावेळी मिलिंद 52 वर्षांचा तर अंकिता 26 वर्षांची होती. लवकरच तो ‘पौरषपूर’ या वेबसीरिजमध्ये एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘न्यूड रन’वरून टीका, आता कौतुकाचा वर्षाव; मिलिंद सोमणने वेचला मंदिराच्या वाटेतला कचरा

Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

टॅग्स :मिलिंद सोमण