बॉलिवूडमधील सर्वात फिट सेलिब्रिटींबाबत बोलायचं झालं तर यात मिलिंद सोमण हे पहिलं नाव असेल. या वयातही मिलिंदची फिटनेस बघून लोक अवाक् होता. मिलिंद सोमणसोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टिव असतो. आपल्या फिटनेसबाबतचे व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असतो. त्याने नुकताच त्याचा असाच व्हिडीओ शेअर केलाय जो त्याच्या फॅन्सना चांगलाच आवडलाय.
एकेकाळी सर्वात यशस्वी सुपरमॉडल आणि अभिनेता राहिलेल्या मिलिंद सोमणने एका पुशअप करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तो व्हेरिएशनसोबत पुशअप करताना दिसत आहे. मिलिंदच्या या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मिलिंदने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, 'रोज काही नवीन ट्राय करा'.
मिलिंद सोमणच्या या व्हिडीओवर यूजर वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'सर असे व्हिडीओ टाकत जाऊ नका. तुमचं पॅशन बघून आम्ही लाजेने मरू'. एका दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'हा माणूस सही आहे, अद्भूत'. एका महिला यूजरने तर मिलिंदला तिचा बालपणीचा क्रशही सांगितलं.