Join us

गर्लफ्रेंडला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसला मिलिंद सोमन, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 10:24 AM

मॉडेल तथा अभिनेता मिलिंद सोमण सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचा वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला असून, गर्लफ्रेंडला पाठीवर बसवून चक्क पुशअप्स मारताना तो दिसत आहे.

सुपरमॉडेल राहिलेला अभिनेता मिलिंद सोमनने १९९५ मध्ये अलिशा चिनायच्या ‘मेड इन इंडिया’ या म्युझिक व्हिडीओमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अलिशाच्या या गाण्याने त्यावेळी संपूर्ण देशात धूम उडवून दिली होती. त्याचबरोबर मिलिंदही या गाण्यामुळे रातोरात स्टार बनला होता. पुढे याच वर्षी म्हणजेच १९९५ मध्ये तो वादाच्या भोवºयातही सापडला होता. जेव्हा तो टफ शूजच्या जाहिरातील मधु सप्रेसोबत अजगर शरीराला गुंडाळून दिसला होता. यावेळी दोघांनी केवळ शूज घातले होते, त्यांच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. मिलिंदच्या या जाहिरातीमुळे एकच खळबळ उडाली होती. आता मिलिंद पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला. होय, ५३ वर्षीय मिलिंद त्याच्या १८ वर्षीय गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला असून, तो तिच्याशी लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिलिंदने त्याच्या या गर्लफ्रेंडची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना करून दिली. तो नेहमीच तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असतो. आता त्याने त्याच्या या गर्लफ्रेंडसोबत एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तो चक्क तिला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसत आहे. वास्तविक मिलिंद स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो. व्हिडीओमध्ये मिलिंद पुशअप करीत असून, त्याची गर्लफ्रेंड चक्क त्याच्या पाठीवर बसलेली आहे. अशातही मिलिंद सहजतेने पुशअप करताना दिसत आहे.  सध्या हे दोघे हिमाचल प्रदेश येथे आहेत. दोघेही धर्मशाळा ते उनापर्यंत १३० किलोमीटर धावणार आहेत. सध्या मिलिंद आणि त्याची गर्लफ्रेंड अनिताची जोडी सोशल मीडियावर हॉट विषय ठरत आहे. दोघे नेहमीच त्यांचे काही मजेशीर फोटोज् सोशल मीडियावर अपलोड करीत असतात. दरम्यान, मिलिंद आणि अनिता लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे. मिलिंदचा हा दुसरा विवाह असून, होणाºया पत्नीच्या कमी वयामुळे तो सध्या चर्चेत आहे.