Join us

​पॅडमॅननंतर आता मिल्कमॅनवर बनवला जाणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 11:30 AM

पॅडमॅन या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. ...

पॅडमॅन या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे सध्या अक्षय जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कुठेही कमतरता पडू नये यासाठी अक्षय प्रयत्न करत आहे. पॅडमॅन या चित्रपटानंतर मिल्कमॅन ऑफ इंडिया यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते आणि अमूल डेअरीचे संस्थापक डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जीवनावर हा चित्रपट असणार आहे. टॉयलेट: एक प्रेम कथा या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाविषयी प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करून सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एकता कपूर आणि टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. भारताचे मिल्कमॅन डॉ. वर्गिस कुरियन यांच्यावर आधारित हा चित्रपट असणार असून या चित्रपटाद्वारे अनेकांना प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. आय टू हॅड अ ड्रीम या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या पुस्तकाचे अधिकार नुकतेच बालाजी टेलिफ्लिम्सने घेतले आहेत. डॉ. वर्गिस कुरियन यांनी अमूल डेअरी, मिल्क मार्केटिंग फेडरेशन, इरमा, एनडीडी बोर्ड, त्रिभुवनदास फाऊंडेशन इत्यादी संस्थांची स्थापना करून गुजरातचे नाव जगभर नेले. त्यांनी नेस्ले किंवा त्यांसारख्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांना अंगावर घेत अमूलचा ब्रँड घडवला. एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. याविषयी चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक बायोपिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बायोपिकमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. आता डॉ. वर्गिस कुरियन यांची भूमिका या चित्रपटात कोण साकारणार हे पाहाणे रंजक असणार आहे. Also Read : यूजर्सनी म्हटले, ‘पॅडमॅन चॅलेंज’ म्हणजे ट्विंकल खन्नाचा ढोंगीपणा; ट्विंकलने दिले जशास तसे उत्तर!