Join us  

Milind Gaba Viral Video : दारुच्या नशेत प्रसिद्ध गायकानं टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये घातला गोंधळ, CCTV फुटेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 10:53 AM

दारुच्या नशेत प्रसिद्ध गायकानं टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला.

Milind Gaba T-Series Office Viral Video : प्रसिद्ध पंजाबी गायक मिलिंद गाबाची (Millind Gaba) गाणी चाहत्यांना खूप आवडतात. मिलिंदने आपल्या आवाजाच्या जोरावर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र, सध्या तो एका वादामुळे चर्चेत आला आहे. त्याने टी-सीरीजच्या कार्यालयात गोंधळ घालतल्याचं बोललं जात आहे. टी-सीरीजच्या (T-Series) कार्यालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही मिलिंद गाबा असल्याचा दावा करण्यात येतोय. 

मिलिंद गाबा यांचा एक व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूडने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये मिलिंद गाबा हा एका मिटिंग हॉलमध्ये बसल्याचं दिसून येत आहे. मीटिंग सुरू असतानाच त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. मीटिंगमध्ये एकत्र बसलेल्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच गायकाचा संयम सुटला आणि त्याने हाणामारी सुरू केली. एका व्यक्तीचा लॅपटॉप आपटून त्याच्या अंगावर धावून जात मिलिंद गाबा धक्काबुक्की करताना दिसतोय. यावेळी मिलिंद हा पुर्ण दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

 

वाद वाढल्याचे पाहून काही लोक त्याला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तो या व्हिडीओमुळे सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, लोकमत या व्हिडिओला दुजोरा देत नाही. हा प्रमोशनल व्हिडीओ आहे की खरा हेही सांगता येत नाही. ३३ वर्षीय मिलिंद गाबा हे संगीत जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. 7 नोव्हेंबर 1990 रोजी नवी दिल्ली येथे जन्मलेल्या मिलिंदने बॉलिवूड चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. मिलिंद गाबा अनेकदा लाइव्ह कॉन्सर्ट करताना दिसतो.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसोशल व्हायरल