'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मण उतेकर (laxman utekar) दिग्दर्शित 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. 'छावा' सिनेमातील प्रत्येक भूमिका चांगलीच गाजली. 'छावा'मध्ये विकी कौशलने (vicky kaushal) साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लोकांना आवडली. याशिवाय अक्षय खन्नाने (akshaye khanna) साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेचीही प्रशंसा झाली. अशातच AIMIM चे वारिस पठाण (waris pathan) अक्षय खन्नाची भेट घेऊन त्याचं कौतुक केलंय. 'छावा'च्या रिलीजनंतर पहिल्यांदाच अक्षय समोर दिसला.अक्षय खन्नाला भेटून वारिस पठाण काय म्हणाले?AIMIM पार्टीचे नेते वारिस पठाण यांनी अक्षय खन्नाची भेट घेतली. यावेळी अक्षय टीशर्ट आणि जीन्स अशा साध्या पेहरावात दिसून आला. 'छावा'च्या रिलीजनंतर प्रमोशन, इव्हेंट कुठेच हजेरी न लावलेला अक्षय यानिमित्ताने पहिल्यांदाच समोर आला. अक्षयला भेटून वारिस पठाण म्हणाले की, "आज छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाची भेट झाली. अक्षय खूप चांगला व्यक्ती आहे. जर 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका कोणी मुस्लिम अभिनेत्याने साकारली असती तर आतापर्यंत प्रकरण कुठच्या कुठे गेलं असतं."
"औरंगजेबाची भूमिका मुस्लिम नटाने साकारली असती तर.."; अक्षय खन्नाला भेटल्यावर MIM नेते काय म्हणाले?
By देवेंद्र जाधव | Updated: March 21, 2025 14:56 IST