‘मम्माज् बॉय’ आर्यन खानचा गौरीसोबतचा हा फोटो एकदा बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 6:50 AM
आर्यन खानने डॅड शाहरूख खानचा नाही तर मॉम गौरी खानसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोपेक्षा या फोटोला आर्यनने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आर्यन खान हा पूर्णपणे ‘मम्माज् बॉय’ आहे. असे नसते तर काल फादर्स डेच्या दिवशी आर्यनने डॅड शाहरूख खानसोबतचा फोटो शेअर केला असता. पण आर्यनने डॅडचा नाही तर मॉम गौरी खानसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोपेक्षा या फोटोला आर्यनने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. होय, ‘दी बर्थ गिव्हर’ अर्थात जन्मदात्री, असे कॅप्शन आर्यनने त्याच्या व मॉमच्या या फोटोला दिले आहे. हे कॅप्शन पाहून गौरीलाही भरून आले असावे. म्हणूनच तिने हाच फोटो पोस्ट करत, ‘लव्ह दी टॅगलाईन...दी बर्थ गिव्हर’ अशा शब्दांत आपला आनंद साजरा केला. ALSO READ : शाहरूख नाही, सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा!आर्यनची डॅड शाहरूखसोबतची चांगली बॉन्डिंग आहे. पण मॉम गौरीच्या तो जरा जास्तच जवळ आहे. त्याच्या कॅप्शनवरून कुणालाही हे कळेल. स्वत: शाहरूख खाननेही आपल्या एका मुलाखतीत त्याच्या तिन्ही मुलांचे गौरीसोबत वेगळेच नाते असल्याचे म्हटले होते. मी माझ्या मुलांसोबत खेळतो, दंगा करतो, चर्चा करतो. मी त्यांचा डॅड कमी अन् मित्र जास्त असतो. गौरीचे म्हणाल तर तिचे मुलांसोबत एक वेगळेच नाते आहे. पालक म्हणून गौरी मुलांसोबत वावरते. त्यांच्या चर्चा वेगळ्या असतात. मी कधीही त्यात पडत नाही. त्यांचे बॉन्डिंग वेगळेच आहे, असे शाहरूखने या मुलाखतीत सांगितले होते.एकंदर काय, तर शाहरूख व गौरी दोघेही पालक या नात्याने आपआपल्या जबाबदाºया योग्य पद्धतीने सांभाळून आहेत. आर्यनचे आईबद्दलचे प्रेम आणि सुहानाचे डॅडवरची माया, हे त्याचेच द्योतक म्हणायला हवे. शाहरूख व गौरीचा मोठा मुलगा आर्यन आता १८ वर्षांचा झाला आहे आणि सुहानासोबत त्याच्याही बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगत आहेत. आता आर्यन कधी मोठ्या पडद्यावर दिसतो ते बघूच. तोपर्यंत मम्मासोबतचा त्याचा हा सुंदर फोटो बघूयात!