'बजरंगी भाईजान', 'एक था टायगर' सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खानची (Kabir Khan) पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री मिनी माथुर (Mini Mathur) सध्या चर्चेत आहे. २५ वर्षांपूर्वी मिनीने कबीर खानशी लग्न केलं. पण कबीरचं खान आडनाव कधीच लावलं नाही. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. पण मिनीने ‘मिनी माथूर’ या नावासोबतच राहणं पसंत केलं. असं का, आता २५ वर्षांनंतर मिनीने यामागील कारणाचा खुलासा केला आहे. तिने ‘सायरस ब्रोचा’ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत मिनी बोलली.
काय म्हणाली ती...माझा नवरा कबीर खान यानेच मला नाव खान आडनाव न लावण्याचा सल्ला दिला होता. त्यामागे एक व्यावहारिक कारण होतं. आडनाव बदलल्यास मला माझी सर्व अधिकृत कागदपत्रे बदलून घ्यावी लागली असती. त्यामुळे कबीरने मला आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला होता. माझ्यासाठी ते खूप सोपं होतं. कबीर खानशी लग्न करण्याआधीपासूनच माझी ओळख मिनी माथुर अशी होती, त्यामुळे मला त्याच्या नावाचा आधार तसाही नको होताच. शिवाय, मी आडनाव बदलू नये, हे त्यानेच मला सांगतलेलं. आडनाव बदलल्यावर बँक, पासपोर्ट या सगळ्या ठिकाणी नाव बदलावं लागेल आणि ही प्रक्रिया खूप किचकट असते. कबीरने कधीच मला माझे नाव किंवा आडनाव बदलायला सांगितलं नाही आणि मला देखील माझं नाव बदलायचं नव्हतं. त्यामुळे आमच्यासाठी हा विषयच संपला होता. आम्ही कधीच त्यावर पुन्हा चर्चा केली नाही, असं ती म्हणाली.