Join us

शाहिदच्या पत्नीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; मीराच्या फोटोवर सासुबाईंची जबरदस्त कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:29 IST

Mira rajput: अलिकडेच मीराने दुबईत ती राहत असलेल्या रेस्टरंटच्या पूल साईड एरियामधील काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) याची पत्नी मीरा राजपूत (mira rajput) साऱ्यांनाच ठावूक आहे. मीरा कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील तिचा सोशल मीडियावरील वावरामुळे ती कायम नेटकऱ्यांच्या चर्चेत येत असते. अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करुन चर्चेत येणारी मीरा सध्या दुबईमध्ये तिच्या गर्ल गँगसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनमधील अनेक फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत. यात अलिकडेच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवर तिच्या सासूने कमेंट केली आहे.

अलिकडेच मीराने दुबईत ती राहत असलेल्या रेस्टरंटच्या पूल साईड एरियामधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने ब्लू टॉप, येलो फ्लॉवर इअरिंग्स आणि कॅट आय सनग्लासेस परिधान केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड क्लासी दिसत असून त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र, शाहिदच्या आईने केलेली कमेंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मीराने शेअर केलेल्या फोटोवर तिची सासू नीलिमा आजीम यांनी कमेंट केली आहे. विशेष म्हणजे त्यांची कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. Oooopho, अशी कमेंट नीलिमा यांनी केली आहे. सोबतच त्यांनी फायर इमोजीदेखील शेअर केल्या आहेत.

टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा