करीनाची कॉपी करू नकोस...! मीरा राजपूतचा ‘अ‍ॅक्टिंग डेब्यू’ पाहून नेटकऱ्यांनी काढला चिमटा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:53 AM2018-08-07T10:53:51+5:302018-08-07T10:54:22+5:30

मीराच्या या फर्स्ट डेब्यू कमर्शिअलची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. मीराने स्वत: ही जाहिरात तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे.

mira rajput gets trolled for her skin transformation ad | करीनाची कॉपी करू नकोस...! मीरा राजपूतचा ‘अ‍ॅक्टिंग डेब्यू’ पाहून नेटकऱ्यांनी काढला चिमटा!!

करीनाची कॉपी करू नकोस...! मीरा राजपूतचा ‘अ‍ॅक्टिंग डेब्यू’ पाहून नेटकऱ्यांनी काढला चिमटा!!

googlenewsNext

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने अखेर अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलेच. दोन वर्षांच्या मुलीची आई असलेली मीरा लवकरच आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. त्याआधीच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अर्थात एका जाहिरातीतून. मीराच्या या फर्स्ट डेब्यू कमर्शिअलची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. मीराने स्वत: ही जाहिरात तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘Being a mother doesn’t mean you stop being yourself right? I took the #Olay #SkinTransformation #28Daychallenge Here’s my #Reborn story.. what’s yours?’, असे कॅप्शन तिने दिले आहे.


ही जाहिरात व्हायरल होताच, काहींनी मीराने भरभरून कौतुक केले आहे. पण अनेकांना मात्र मीराला ट्रोल करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. होय, अ‍ॅण्टी एजिंग क्रिमची जाहिरात करण्याचे तुझे वय नाही, अशा शब्दांत काहींनी मीराला डिवचले आहे तर काहींनी थेट करीनावरून तिला चिमटा काढला आहे. बाई, करीना कपूरची कॉपी करू नकोस, असे एका युजरने तिला म्हटले आहे. अनेकांनी तर शाहिद कपूरच्या मुलांची आई बनण्याकडे मीराकडे काहीही स्किल नाही, असे सांगत तिच्या या अ‍ॅक्टिंग डेब्यूची टिंगल केली आहे.

या जाहिरातीत मीरा तिच्या बेबी बम्पमध्ये दिसतेय. जाहिरातीत शाहिद कुठेच नाही़ पण शाहिद व मीशाचे फोटो मात्र यात दिसत आहेत. आतापर्यंत 1 लाखांवर लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. तुम्हीही पाहा आणि मीराच्या या अ‍ॅक्टिंग डेब्यूबद्दल तुमचे काय मत आहे, ते आम्हाला नक्की सांगा.

Web Title: mira rajput gets trolled for her skin transformation ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.