शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिने अखेर अॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलेच. दोन वर्षांच्या मुलीची आई असलेली मीरा लवकरच आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. त्याआधीच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अर्थात एका जाहिरातीतून. मीराच्या या फर्स्ट डेब्यू कमर्शिअलची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. मीराने स्वत: ही जाहिरात तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘Being a mother doesn’t mean you stop being yourself right? I took the #Olay #SkinTransformation #28Daychallenge Here’s my #Reborn story.. what’s yours?’, असे कॅप्शन तिने दिले आहे.
या जाहिरातीत मीरा तिच्या बेबी बम्पमध्ये दिसतेय. जाहिरातीत शाहिद कुठेच नाही़ पण शाहिद व मीशाचे फोटो मात्र यात दिसत आहेत. आतापर्यंत 1 लाखांवर लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. तुम्हीही पाहा आणि मीराच्या या अॅक्टिंग डेब्यूबद्दल तुमचे काय मत आहे, ते आम्हाला नक्की सांगा.