शाहिद कपूर जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी मीरा राजपूतही लोकप्रिय आहे. म्हणायला, मीराचा फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नाही. पण तरीही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. 2015 साली शाहीद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहीदच्या घरी मीशा नावाचे कन्यारत्न जन्मास आले. यानंतर 2018 मध्ये शाहीदला पुत्ररत्न प्राप्त झाले. अलीकडे काही मीरा आणि शाहीद तिस-यांदा आई - बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता याचे कन्फर्मेशन तर व्हायलाच हवे ना. आता मीरानेच यावर उत्तर दिले आहे.अलीकडे मीराने चाहत्यांसाठी AskMeAnything सेशन ठेवले. यावेळी अनेक चाहत्यांनी तिला अतरंगी प्रश्न केलेत. एका चाहत्याने तर नेमकी संधी साधली आणि मीराला तिच्या प्रेग्नंसीबद्दल प्रश्न केला.
तू तिस-यांदा प्रेग्नंट आहेस, हे खरे आहे का? असा सवाल या चाहत्याने केला. यावर मीराने ‘नो’ असे उत्तर दिले. सोबत लॉफिंग इमोजी पोस्ट केला.‘ मला माहित नाही या सगळ्या चर्चा कुठून सुरू झाल्या. पण सध्यातरी अशी काही गुड न्यूज आमच्याकडे नाहीये, असेही तिने स्पष्ट केले.
मीरा बॉलिवूड डेब्यू करणार, अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यावरही तिने खुलासा केला. हात जोडणारा इमोजी पोस्ट करत, या प्रश्नालाही तिने ‘नो’ असे उत्तर दिले.
मुलं की शाहिद, यापैकी कोण अधिक त्रास देतात? या प्र्रश्नावर उत्तर देणे मीराने टाळले. यावर तिने केवळ स्माईली पोस्ट केली.
मीराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर ‘नच बलिये’ शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र काही कारणामुळे मीराचे आॅनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते.