कालीन भैया, मुन्ना भैया, बिना त्रिपाठी, गोलू गुप्ता, मौर्या साहब, डिंपी ही नाव घेतली तरी ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिज आणि त्यातील या पात्रांचा अभिनय डोळ्यांपुढे येतो. ‘मिर्झापूर’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. गेल्या 23 ऑक्टोबरला या सीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘मिर्झापूर 2’ रिलीज झाला. सध्या या सीझनची जोरदार चर्चा सुरु आहे. पण तूर्तास आम्ही या सीरिजमधीलप्रमुख कलाकारांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कालीन भैया
अभिनेता पंकज त्रिपाठीने या सीरिजमध्ये कालीन भैयाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर याच कालीन भैयाचा बोलबाला आहे. या कालीन भैयाची अर्थात पंकज त्रिपाठीची एकूण संपत्ती किती आहे माहितीये? मीडिया रिपोर्टनुसार, पंकज त्रिपाठी 30 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. कधी काळी पंकज त्रिपाठी नावाचा हाच अभिनेता निर्मात्यांचे उंबरठे झिजवायचा. दिवसरात्र भटकत काम शोधायचा. आज मात्र काम त्यांना शोधत येते.
मुन्ना त्रिपाठी
मुन्ना त्रिपाठीची भूमिका अभिनेता दिव्येंद्रू शर्माने जिवंत केली आहे. याआधी तो प्यार का पंचनामा, बत्ती गुल मीटर चालू, टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमात तुम्ही त्याला पाहिले असेल. दिव्येन्द्रू 37 वर्षांचा आहे आणि 14 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
गुड्डू पंडित
अभिनेता अली फजल या वेबसीरिजमध्ये गुड्डू पंडितच्या भूमिकेत आहे. अली फजल अर्थात गुड्डू भैयाची एकूण संपत्ती 23 कोटी इतकी आहे. अली फजलने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, त्याला आधी या वेबसीरीजमध्ये मुन्ना त्रिपाठीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्यासोबतच त्याची गुड्डू पंडीतच्या भूमिकेसाठीही टेस्ट करण्यात आली होती. अखेर निर्णय घेण्यात आला की, तो गुड्डूची भूमिका साकारणार.
गोलू उर्फ गजगामिनी गुप्ता
मूर्ती लहान किर्ती महान, या म्हणीप्रमाणे श्वेता त्रिपाठीने अॅक्टिंग क्षेत्रात स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. श्वेताने ‘मिर्झापूर 2’मध्ये गोलू उर्फ गजगामिनी गुप्ताची भूमिका साकारली आहे. श्वेताची नेटवर्थ एकूण 8 कोटी आहे. ‘मसान’ या सिनेमात श्वेताने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. ‘हरामखोर’ या सिनेमात ती नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या मुरलेल्या कलाकाराबरोबर दिसली होती.
बिना त्रिपाठी
बिना त्रिपाठी कोण तर कालीन भैयाची बायको. बिना त्रिपाठीची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गलने साकारली आहे. रसिका दुग्गलची एकूण संपती 7 कोटी आहे.