Join us

कॅमेरासमोर बोल्ड झाली 'कालीन भैय्या'ची साधी-भोळी सून, फॅन्स म्हणाले - भाभी तुम्ही तर आग लावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:07 IST

ईशा तलवार (Isha Talwar) नेहमीच तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तिचं बोल्ड फोटोशूट चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री ईशा तलवार (Isha Talwar) ने लोकप्रिय वेबसीरीज 'मिर्झापूर २' मधून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. तिने यात माधुरी यादवची भूमिका साकारली होती. माधुरी यादव यात फारच साधी-भोळी दाखवण्यात आली होती. पण ही भूमिका साकारलेली ईशा तलवार रिअल लाइफमध्ये फारच बोल्ड आहे. नेहमीच तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा तिचं बोल्ड फोटोशूट चर्चेत आलं आहे.

व्हिडीओत ईशा कधी मोनोकिनीमध्ये तर कधी हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. या आउटमध्ये ती फारच हॉट दिसत आहे. तिने कॅमेरासमोर बोल्ड फोटोशूट केलं आहे आणि एकापेक्षा एक किलर पोज दिले आहेत. जे बघून तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे. 

ईशाने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'फोटो एक मूड अनेक'. तिच्या या फोटोंना भरभरून लाइक मिळत आहेत आणि शेअर केले जात आहेत. एका फॅनने कमेंट करत लिहिलं की, माधुरी भाभी जिंदाबाद. दुसऱ्याने लिहिलं की, तू फार सेक्सी दिसत आहे. तर एकाने लिहिलं की, माधुरी भाभी तुम्ही तर आग लावली. 

ईशा तलवारने वेब सीरीज 'मिर्झापूर २' मध्ये कालीन भैय्या म्हणजे पंकज त्रिपाठीच्या सूनेची भूमिका साकारली होती. जे नेहमीच साडीत दिसली होती. यात तिने दिव्येंदु शर्मासोबत इंटिमेट सीन्स दिले होते. ईशा तलवारला भलेही मिर्झापूर २ मुळे ओळख मिळाली पण तिने काही बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडियामिर्झापूर वेबसीरिज