Join us

'मिर्झापूर' फेम अभिनेत्री अनंगशा बिस्वासची तो निकल पडी..., लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:00 IST

मिर्झापूरमधून अभिनेत्री अनंगशा बिस्वासने डिजिटल माध्यमात पदार्पण केले

डिजिटल माध्यमात लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज मिर्झापूरमधून अभिनेत्री अनंगशा बिस्वासने डिजिटल माध्यमात पदार्पण केले. अनंगशाने या सीरिजमध्ये जरीनच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतूक झाले होते. आता ती मिर्झापूरच्या सीक्वेलमध्येही काम करताना दिसणार आहे. दुसऱ्या सीझनमधील तिच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. 

याबाबत अनंगशा बिस्वास म्हणाली, मिर्झापूरचा हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता. या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. प्रेक्षकांनी जरीनला दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. प्रेक्षकांकडून मला मिळालेले प्रेम मला पुढे काम करण्यासाठी आणखीन प्रेरणा देणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याआधी माया २ या शॉर्ट फिल्ममध्ये, प्रिया गौर, लीना जुमानजी आणि प्रणव सचदेव या नामांकित कलाकारांसोबत काम केले आहे. या व्यतिरिक्त तिने "अंधेरी" आणि "सेल ट्रॅपसहा" अनेक शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे आणि चित्रपट "लव शव ते चिकन" आणि "खोया खोया चांद" या चित्रपटातही काम केले आहे.

अभिनेत्री अनंगशा लवकरच आपल्या चाहत्यांसाठी "मिर्झापूर २" मध्ये एक धमाकेदार अंदाज आणि स्टोरी लाईन सकट येणार आहे. ह्या व्यतिरिक्त असंख्य नवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज