Priyanka Chopra Miss World: प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता केवळ एक बॉलिवूड स्टार राहिलेली नाही तर ग्लोबल स्टार बनली आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियंकाने 2000 साली ‘मिस वर्ल्ड 2000’चा (Miss World 2000) खिताब पटकावला होता. मिस वर्ल्ड बनल्यानंतर प्रियंकाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. पण आता तब्बल 22 वर्षानंतर ‘मिस वर्ल्ड’ प्रियंकावर गंभीर आरोप होत आहेत. होय, माजी मिस बारबाडोस लिलानी मॅककॉने (Leilani McConney) हिने प्रियंकाच्या ‘मिस वर्ल्ड’ जिंकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 2000 मध्ये ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील प्रियंकाचा विजय ‘फिक्स’ होता, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे. आरोप लावणारी लिलानी ही प्रियंकासोबत या स्पर्धेत सहभागी झाली होती. आता ती एक युट्यूबर आहे. आपल्या एका व्हिडीओमध्ये तिने प्रियंकावर गंभीर आरोप केले आहेत.
लिलानीने 22 वर्षांनंतर का केलेत आरोप?मिस युएसए ब्युटी पेजेंट ही स्पर्धा सध्या वादात सापडली आहे. या स्पर्धेत मिस टेक्सास R'Bonny Gabriel हिने मिस युएसए 2022 चा खिताब जिंकला. पण तिच्या विजयाची घोषणा होताच, तिच्या सोबतच्या स्पर्धक सौंदर्यवती तिचं अभिनंदन करण्याऐवजी स्टेजवरून खाली उतरल्या. सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. अनेकांनी सौंदर्य स्पर्धा या फिक्स असतात, असा आरोप केला. याच पार्श्वभूमीवर माजी मिस बारबाडोस लिलानी हिने प्रियंकाच्या मिस वर्ल्ड बनण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रियंकाचा विजय हा फिक्स होता, असं तिने म्हटलं आहे.
लिलानीचे आरोप...आपल्या व्हिडीओत लिलानीने अनेक आरोप केले आहेत, ती म्हणते, ‘मिस वर्ल्ड 1999 जिंकणारी एक भारतीय होती आणि मिस वर्ल्ड 2000 जिंकणारीही एक भारतीय होती. या दोन्ही स्पर्धेत एक भारतीय कंपनी स्पॉन्सर होती. झी टीव्हीने ही स्पर्धा स्पॉन्सर केली होती. 2000 स्पर्धेत मी मिस सुद्धा एक स्पर्धक होते. त्यावेळी प्रियंकाला विशेष वागणुक दिली गेली होती. तिला तिच्या बेडवर जेवण मिळायचं. तिचे फोटो मोठे छापले जायचे आणि अन्य मुलींचे ग्रूप फोटो छापून यायचे. या स्पर्धेत प्रियंका एकमेव अशी स्पर्धक होती जिला स्विमसूट राऊंडमध्ये सारोंग (स्कार्फ टाईप, जो कमरेभोवती बांधतात) घालण्याची परवानगी देण्यात आली होती. ती स्किन टोन चांगली ठेवण्यासाठी एक क्रिम वापरते पण ती क्रिम काम करत नसल्यामुळे ती स्विमसूट राऊंडमध्ये सारोंग घालू इच्छिते, असं सांगण्यात आलं होतं. त्या स्पर्धेत आलेल्या स्पर्धकांपैकी कुणालाही प्रियंका आवडली नव्हती. शोचे आयोजक कायम अन्य मुलींसोबत भेदभाव करायचे. अन्य मुलींसाठी एकाच ठिकाणावर जेवण यायचं. याऊलट प्रियंकाला बेड नाश्ता दिला जायचा. ती जिंकायच्या आधीच तिचं फोटोशूट झालं होतं आणि ते होत असताना अन्य मुलींना समुद्रकिनारी वाळूवर उभं केलं होतं.
प्रियंकाला दिला गेला होता फिटिंग ड्रेसज्या डिझाईनरने सर्व स्पर्धकांचे ड्रेस बनवले होते, त्याने प्रियंकाला सर्वात चांगल्या फिटिंगचा ड्रेस दिला. बाकी मुलींच्या ड्रेसची फिटिंग मात्र बिघडलेली होती, असा आरोपही लिलानीने केला.लिलानीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही लोकांनी तिचा सपोर्ट केला आहे. पण अनेकांनी ही 22 वर्षे गप्प का राहिली? 22 वर्षानंतर आरोप का करतेय? असा सवाल केला आहे. सध्या प्रियंका चोप्रा भारतात आहे. सुमारे 3 वर्षानंतर ती मायदेशी आली आहे.