Join us

ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- "छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:23 IST

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने कुंभमेळ्यात संन्यास घेतला. आता आणखी एक अभिनेत्री संन्यास घेत साध्वी बनली आहे.

प्रयागराज येथे होणारा महाकुंभमेळा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने कुंभमेळ्यात संन्यास घेतला. आता आणखी एक अभिनेत्री संन्यास घेत साध्वी बनली आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मिस इंडियाचा खिताब नावावर करणारी इशिका तनेजा आहे. 

ग्लॅमरस दुनियेला रामराम करत इशिकाने सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचं ठरवलं आहे. द्वारका-शारदा पीठचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून तिने गुरू दीक्षा घेतली आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही जीवनात काहीतरी कमी जाणवत असल्याचं इशिताचं म्हणणं आहे. सुख-शांतीबरोबरच जीवन सुंदर बनवण्यासाठी साध्वी बनण्याचा निर्णय घेतल्याचं इशिताने सांगितलं. 

आजतकशी बोलताना इशिता म्हणाली, "मी साध्वी नाही. मी गर्वाने सांगते मी सनातनी आहे. माझ्या मनात सेवा भाव आहे. महाकुंभात दिव्य शक्ती आहेत. शंकराचार्य यांच्याकडून गुरू दीक्षा मिळाली, हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आहे. गुरू मिळाल्याने आयुष्याला दिशा मिळाली आहे. मला गिनीज बुकचा अवॉर्ड मिळाला आहे. मी मिस वर्ल्ड टूरिजमचा किताब पटकावला आहे. हद ही वेब सीरिज मी केली आहे. टी सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं आहे. पण, मी योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. छोटे कपडे घालून डान्स करण्यासाठी महिलांचा जन्म झालेला नाही. तर सनातन धर्माची सेवा करण्यासाठी झाला आहे".

इशिकाही ३० वर्षांची आहे. तिने मिस इंडिया, मिस ब्युटी विथ ब्रेन हे किताब नावावर केले आहेत. २०१६ साली तिला "भारतातील १०० महिला अचिव्हर्स" या राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारकुंभ मेळा