Baaghi 4: साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. बाघी युनिव्हर्सचे पहिले तीन भाग गाजल्यानंतर चौथ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफ(tiger Shoroof), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सोनम बाजवा यांच्यासोबतच 'बाघी-४' मध्ये आता एका नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे. 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधू (Harnaaz Sandhu) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच 'बाघी-४' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं. त्याद्वारे चित्रपटातील व्हिलनच्या भूमिकेवरून पडदा हटवण्यात आला.अभिनेता संजय दत्तचा रक्तरंजित लूक असणारं पोस्टर शेअर करत 'बाघी-४' मधील खलनायकाबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर या फ्रॅंचाइझीमध्ये अभिनेत्री सोनमा बाजवाच्या नावाची घोषणा करण्यात आली. सोनम चित्रपटात टायगक श्रॉफसोबत प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता बाघी युनिव्हर्समध्ये मिस युनिव्हर्स हरनाज संधूची वर्णी लागली आहे. 'Nadiadwala Grandson Entertainment'द्वारे 'बाघी-४' मध्ये हरनाज संधूची एन्ट्री झाल्याची घोषणा करण्यात आली आहे."मिस युनिव्हर्सपासून बाघी यूनिव्हर्सपर्यंतचा प्रवास..." असं कॅप्शन देत एक्सवर 'Nadiadwala Grandson Entertainment' कडून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.
'बाघी-४' मध्ये हरनाज संधू टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हरनाज या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. बाघी यूनिव्हर्सचा हा सिनेमा ५ सप्टेंबर २०२५ मध्ये जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.