Join us

सुष्मिता सेन आहे जबरदस्त फिटनेस फ्रिक अभिनेत्री, वायरल झाला बॅक फ्ल‍िप व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 3:25 PM

ब-याचदा जिममध्ये सुष्मिता एक्स- बॉयफ्रेंड रोहमनसह वर्कआऊट करताना दिसायची.

सुष्मिता सेन इतर सेलिब्रेटींप्रमाणे फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. वयाच्या 43 व्या वर्षी सुष्मिताचा अंदाज हा भल्या भल्यांच्या भुवया उंचावण्यास भाग पाडतो. इतकी ती फिट दिसते. ती नित्यनियमाने व्यायाम करते. नुकतेच तिने जिममधला फ्लिप व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत बॅक फ्ल‍िप करत पॉवर रिंग एक्सरसाइज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिला सतत अॅक्टीव्ह राहायला आवडतं. या माध्यमातून मी ख-या आयुष्यात कशी आहे. याचा अंदाज चाहत्यांना येतो. त्यामुळे सोशल मीडियावर अपडेट शेअर करायला आवडतं असल्याचे सुष्मिताने सांगितले.

ब-याचदा जिममध्ये सुष्मिता एक्स- बॉयफ्रेंड रोहमनसह वर्कआऊट करताना दिसायची. गेल्या काही दिवसापासून रोहमनसह ब्रेक झाल्यामुळे चर्चेत होती. मात्र ब्रेकअप झाले नसल्याचे सुष्मिताने शेअर केलेल्या एका फोटोवरून स्पष्ट होते.

सुष्मिता लवकरच रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र ती कोणत्या सिनेमातून नाही तर वेबसिरीजच्या माध्यमातून तिचे रसिकांना दर्शन घडणार आहे.आता माझ्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळली असल्याचे खुद्द सुष्मिताने सांगितले होते. अभिनय क्षेत्राकडे वळ्यासाठी खूप वेळ लागला. खूप मोठा ब्रेक झाल्यामुळे मी हे माझे कमबॅक पेक्षा एक नवीन सुरूवातच म्हणेन असे सुष्मिताने सांगितले. 

टॅग्स :सुश्मिता सेन