Join us

गेल्या 10 वर्षांपासून गायब आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री, पतीवर केले होते गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 3:41 PM

पतीवर तिने अनैर्सगिक शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असल्याचा आरोप केला होता.

युक्ता मुखी नाव तरी आठवतेय की, मिस वर्ल्ड आणि नंतर बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारी युक्ता मुखी बॉलिवूडपासून 10 वर्षपासून बॉलिवूड दूर आहे.  आज युक्ता आपला वाढदिवस साजरा करतेय. मात्र युक्ता सध्या काय करते हे कुणालाचं ठाऊक नाहीय. 

1999 साली युक्ता मुखीने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर याच वर्षी तिने मिस वर्ल्डचा किताबसुद्धा जिंकला होता. युक्ताचा जन्म 1979मध्ये बेंगळुरुमध्ये सिंधी कुटुंबीयात झाला होता. 1986 पर्यंत दुबईत होती त्यानंतर ती मुंबईत परत आली. मिसवर्ल्ड झाल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

2002 मध्ये आलेल्या प्यासा सिनेमातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती प्सासा, कटपुतली आणि लव इन जापान सिनेमात दिसली होती. युक्ताला तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये खूप काही यश मिळाले नाही. बॉलिवूडनंतर तिने एका भोजपुरी सिनेमातदेखील काम केले. युक्ता शेवटची 2008 मध्ये आलेल्या मेमसाब सिनेमात ती शेवटची दिसली होती.       

2008 मध्ये युक्ताने न्यूयॉर्कचा बेस्ड बिजनेसमन प्रिंस तुलीसोबत लग्न केले. लग्नाचे शाही रिसेप्शन सुद्धा तिने दिले. युक्ताला एक मुलगादेखील झाला. मात्र 2013 मध्ये अशी बातमी आली ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरुन गेले. युक्ताने प्रिंसच्या विरोधात एफआयआर दाखल केली.  युक्ताने प्रिन्स व त्यांच्या कुटुंबियांविरोधात विश्वासघाताचा गुन्हा नोंदवला होता़ तर प्रिन्स हे अनैर्सगिक शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असल्याची स्वतंत्र तक्रारही युक्ताने दाखल केली होती. 2014 मध्ये दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. युक्ता सध्या कुठे आहे, काय करते हे कुणालाच माहिती नाही. सोशल मीडियावर तेच अकाऊंटदेखील नाही. युक्ता गेल्या 10 वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे.  

टॅग्स :बॉलिवूड