Join us  

VIDEO : काही खातेस की नाही? ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 1:04 PM

 Manushi Chhillar Airport video : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आता बॉलिवूड स्टार झालीये. ‘सम्राट पृथ्वीराज’मधून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या याच मानुषी छिल्लरचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

 Manushi Chhillar Airport video : माजी मिस वर्ल्ड  मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) आता बॉलिवूड स्टार झालीये. ‘सम्राट पृथ्वीराज’मधून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या याच मानुषी छिल्लरचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. होय,अलीकडे मानुषी छिल्लर मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. ब्लॅक स्वेटशर्ट आणि ब्लॅक टाईट्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. पण कारमधून उतरून ती जशी कॅमेऱ्यांना पोझ द्यायला उभी झाली, तशी ट्रोल झाली. सोशल मीडिया युजर्सनी तिच्या बॉडी टाईपवरून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

 व्हिडीओमध्ये मानुषीला पाहून अनेकांनी तिला हडकुळी म्हटलं. काहींनी  खायला मिळत नसल्याचं म्हटलं. नॉट हिरोईन मटेरिअल म्हणत, काहींनी तिला ट्रोल केलं. मानुषी छिल्लर फारच चिल्लर दिसते, अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मानुषी अलीकडे अक्षय कुमारसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये दिसली. गेल्या महिन्यात 3 जूनला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  दणकून आपटला. अर्थात पहिला चित्रपट फ्लॉप होऊनही मानुषीची डिमांड कमी झालेली नाहीये. चर्चा खरी मानाल तर मानुषीने एकापाठोपाठ एक असे दोन सिनेमे साईन केले आहेत.

ताज्या चर्चेनुसार,  मानुषीने विकी कौशलसोबत तिसरा चित्रपट साईन केला आहे. यशराज चित्रपट त्याची निर्मिती करणार असून यात दोन मोठे स्टार्स लीड रोलमध्ये आहेत. मानुषीच्या आगामी चित्रपटांसाठी तिचे चाहते खूप उत्सुक असून ती कोणती भूमिका साकरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती समोर आलेली नाही. 

टॅग्स :मानुषी छिल्लरबॉलिवूड