Join us

"बसमधला तो स्पर्श अतिशय किळसवाणा..." मिथिला पालकरने सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 4:37 PM

मिथिलाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला.

अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) ओटीटी विश्वात खूप लोकप्रिय आहे. 'गर्ल इन द सिटी', 'लिटिल थिंग्स' या तिच्या गाजलेल्या वेबसिरीज आहेत. मिथिला दादरला तिच्या आज्जी आजोबांकडेच राहायची आणि तिथेच लहानाची मोठी झाली. आपल्या टॅलेंटच्या जोरावर आज ती इथपर्यंत पोहोचली आहे. मिथिलाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. दादरला असताना ती बसने प्रवास करायची. त्यावेळचा एक भीतीदायक अनुभव तिने नुकताच एका मुलाखतीत शेअर केला.

मिथिला म्हणाली,'मी एकदा बसमधून प्रवास करत होते. बस गच्च भरली होती. मी सीटवर बसले होते. तेव्हा मला कोणीतरी मागून स्पर्श केल्याचं जाणवलं. तो स्पर्श नक्कीच चुकून झालेला नव्हता. मला अतिशय किळसवाणे वाटले. मी मागे वळून बघणार तेवढ्यात ती व्यक्ती गायब झाली होती. नक्की कोणी स्पर्श केला हे मला कळूच शकले नाही.'

ती पुढे म्हणाली,'बसमध्ये गर्दी असताना धक्का लागतो, चुकून स्पर्श होत असतो. पण मला लगेच कळलं की तो स्पर्श जाणूनबुजून झाला नव्हता. माझ्यासाठी ती घटना अतिशय किळसवाणी होती.'

मिथिला पालकरने रेणुका शहाणे यांच्या 'त्रिभंगा' या सिनेमातही काम केले. तसेच तिने इरफान खानसह 'कारवां' या सिनेमात भूमिका साकारली होती. मिथिला सध्या ओटीटी माध्यमात सक्रिय आहे.

टॅग्स :मिथिला पालकरसोशल मीडिया