Join us

सुशांतच्या जाण्याने दु:खी आहेत मिथुन चक्रवर्ती, आज साजरा करणार नाहीत वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:12 IST

सुशांत सिंग राजपूत याच्या निधनामुळे बॉलिवूड स्तब्ध आहे.  त्याच्या मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

ठळक मुद्देमिथुन आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनामुळे बॉलिवूड स्तब्ध आहे. 34 व्या वर्षी सुशांतने आत्महत्या करत जीवन संपवले. त्याच्या मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अशात बॉलिवूडचे दिग्गज नेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे.मिथुन यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने ही माहिती दिली. यावर्षी माझ्या वडिलांनी वाढदिवस सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हिड 19 चा प्रकोप आणि आमचा प्रिय मित्र सुशांत सिंग राजपूत याच्या अकाली निधनामुळे ते वाढदिवस साजरा करणार नाहीत, असे नमाशीने सांगितले.

सोबत नमाशीने सर्व लोकांना घरात सुरक्षित राहण्याचे तसेच एकोप्याने राहण्याचे आवाहनही केले आहे. वेळ काढून कुटुंबांसोबत मित्रांसोबत बोला. जे तुम्हाला आवडतात व जे आवडत नाहीत, यापैकी कोणालाही शब्दांनी घायाळ करू नका. संयमाने ऐका. अहंकाराचा त्याग करा. व्यक्त व्हा कारण नैराश्य आपला खूप मोठा शत्रू आहे, असेही नमाशीने लिहिले आहे.

मिथुन आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 16 जून 1952 रोजी जन्मलेल्या मिथुन दांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. आपल्या सिनेकारकिर्दीत त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत़ त्यांचे पर्सनल लाइफही चर्चेत राहिले.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत