कास्टिंग काऊच हा शब्द कलाविश्वासाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक नवोदित अभिनेत्रींना या कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी यावर उघडपणे भाष्यही केलं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मल्लिका शेरावतने (mallika sherawat) तिला सुरुवातीच्या काळात कशाप्रकारे या समस्येला सामोरं जावं लागलं हे सांगितलं होतं. त्यानंतर आता अभिनेता मिथून चक्रवर्ती (mithun chakraborty) यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) हिने भाष्य केलं आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याची सून असूनही तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. अलिकडेच एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं.
छोट्या पडद्यावर राज्य करणारी मदालसा सध्या अनुपमा या गाजलेल्या मालिकेत काव्या ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेच्या निमित्ताने तिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीला तिला कशाप्रकारे वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं हे तिने सांगितलं.
'रात्री ३ वाजताही तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल'; कास्टिंग काऊचविषयी मल्लिकाने उघड केलं गुपित
"आजच्या काळात मुलगा किंवा मुलगी दोन्ही होणं घातकच आहे. खासकरुन जर तुम्ही कॉर्पोरेट जगतात वावरत असाल तर एका मुलीच्या अवतीभोवती सतत पुरुषांचा वावर असतो. यात काही जण मुद्दाम तुमच्याशी सलगी करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे नेमकी कशाची निवड करायची हे तुमच्या हातात आहे. जर मनात आणलं तर तुम्ही या वाईट लोकांमधून सहज मार्ग काढू शकता", असं मदालसा म्हणाली.
PHOTOS: मिथून चक्रवर्ती यांची सून आहे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत
पुढे ती म्हणते, "बऱ्याचदा काही मिटिंगमध्ये काही व्यक्तींनी मला अनकम्फर्टेबल करायचा प्रयत्न केला. त्यामुळे या लोकांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी थेट तिथून बाहेर निघून आले. मी जर तेथून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर कोणीही मला अडवू शकत नाही.आणि तशी कोणाची हिंमतही नाही. मी इथे एक अभिनेत्री म्हणून पदार्पण केलंय. आणि, मी माझं काम करुन सरळ निघून जाते. आपल्या आयुष्यासोबत कशाप्रकारे डील करायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं. त्यामुळे कोणीही तुमच्यावर ताबा मिळवू शकत नाही."
दरम्यान, मदालसाने हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.