Join us

सुष्मिता सेनसोबत बोल्ड सीन देताना मिथुन चक्रवर्तीने केला होता चुकीचा स्पर्श !!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 2:15 PM

बॉलिवूडमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांच्यात शूटिंगदरम्यान दुश्मनी होत असते. पुढे ही दुश्मनी कोणत्या स्तराला जाईल याचा अंदाज घेणे ...

बॉलिवूडमध्ये बरेचसे असे कलाकार आहेत, ज्यांच्यात शूटिंगदरम्यान दुश्मनी होत असते. पुढे ही दुश्मनी कोणत्या स्तराला जाईल याचा अंदाज घेणे मुश्कील असते. कारण बºयाचदा आरोप-प्रत्यारोपामुळे बडा स्टारही यामध्ये गोवला जातो, असाच काहीसा प्रकार अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यात घडला होता. दोघांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती. हा वाद एवढा विकोपाला गेला होता की, सुष्मिताने मिथुनदावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. होय, हा किस्सा ‘चिंगारी’ या चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटात दोघांनाही एक बोल्ड सीन द्यायचा होता; मात्र यासाठी सुष्मिता खूपच घाबरलेली होती. कारण तिचे मिथुन यांच्यासोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. शिवाय शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यात खटके उडत होते. पुढे-पुढे तर हे दोघे सेटवर एकमेकांचे तोंड बघणेही पसंत करीत नव्हते. अशात जेव्हा हा सीन करण्याची वेळ आली तेव्हा सुष्मिता खूपच घाबरून गेली होती. तर मिथुनही सुष्मितासोबत हा सीन करताना नव्हर्स होते. अशाही स्थितीत सुष्मिता हा सीन करण्यास तयार झाली, परंतु तिच्या मनात भीती कायम होती. वास्तविक या अगोदर दोघांनीही त्यांच्या को-स्टार्ससोबत अशाप्रकारचे सीन्स दिले होते. परंतु या सीनसाठी मात्र दोघांमध्ये कमालीचे अंतर दिसत होते. ठरल्याप्रमाणे सीन पूर्ण करण्यात आला, परंतु याच दरम्यान सुष्मिताने मिथुनदावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. सुष्मिताच्या मते, ‘इंटिमेट सीनदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटले होते, त्यांनी चुकीचा स्पर्श केला.’ सूत्रानुसार, हा सीन करण्यासाठी दोघांनाही बरेच रीटेक घ्यावे लागले; मात्र जेव्हा फायनल टेक झाला तेव्हा सुष्मिता रागाने सेटवरून निघून गेली. सुष्मिताला नेमका कशाचा राग आला याचा कोणालाच अंदाज नव्हता. त्यानंतर सुष्मिताने थेट दिग्दर्शक कल्पना लाजमी यांच्याकडे मिथुनदाची तक्रार केली. तिने म्हटले की, ‘रेप सीन शूट करताना मिथुन यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.’ परंतु दिग्दर्शक कल्पना लाजमी, यांनी सुष्मिताच्या आरोपांकडे फारसे गांभीर्याने न घेता, ‘त्यांच्याकडून कळत-नळकत असे झाले असावे, तू हे सर्व विसरून जा’ असा सुष्मिताला सल्ला दिला. परंतु सुष्मिता एवढ्या सहजासहजी हे प्रकरण मिटविण्यास तयार नव्हती. जेव्हा दिग्दर्शकांनी तिच्या आरोपांकडे दुर्लक्ष केल्याचे तिच्या लक्षात आले तेव्हा तिने बाहेर या प्रकरणाची वाच्यता करण्यास सुरुवात केली. पुढे हे प्रकरण एवढे पेटले की, त्याचा मिथुनदा यांनाही धक्का बसला. ते पूर्णत: हतबल झाले होते. इंडस्ट्रीतही यावरून चांगलीच गरमागरम चर्चा रंगू लागली. अखेर काही काळानंतर सुष्मिताला तिची चूक लक्षात आली. एवढ्या मोठ्या सीनिअर कलाकारावर आपण अशाप्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याची तिला जाणीव झाली. तिने याबाबतचा पश्चातपही व्यक्त केला होता. परंतु सुष्मिताने ज्या पद्धतीने हे प्रकरण रेटून नेले होते, त्यावरून इंडस्ट्रीत आणि माध्यमांमध्ये मात्र चांगलाच कल्लोळ माजला होता.