बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती (mithun chakroborty)याच्या लेकाने नमाशी चक्रवर्ती (Namashi chakroborty) याने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. 'बॅड बॉय' या त्याच्या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतर हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नमाशी याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांना मिळालेल्या प्रसिद्धीवर आणि आईचं प्रकाशझोतापासून दूर असण्याविषयी भाष्य केलं आहे. इतंकच नाही तर लोकांनी वडिलांवर खूप फोकस केलं. पण, माझी आई एक अभिनेत्री असूनही तिच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं असं मत त्याने मांडलं.
आजच्या काळात सिनेमाला थिएटर मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. माझा सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज झाला. त्यानंतर आता तो टीव्ही, ओटीटीवर रिलीज झाला आहे. माझा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो थिएटरमध्ये फारसा चालला नाही. पण, ओटीटीवर आल्यानंतर त्याला पाहणाऱ्यांची संख्या १०० पटीने वाढली आहे. त्यामुळे थिएटरसोबतच आता मला टीव्ही, ओटीटी महत्त्वाचे वाटू लागले आहेत, असं नमाशी म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला आता वडिलांमुळे नाही तर माझं काम पाहून लोक फोन करत आहेत. पूर्वी मी जेव्हा ऑडिशनला जायचो. त्यावेळी मुद्दाम वडिलांची ओळख लपवून ठेवायचो. कारण, माझी स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी हीच माझी इच्छा होती. आता माझा सिनेमा आलाय त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचलोय. पण, प्रेक्षकांसोबतच इंडस्ट्रीतल्या लोकांनीदेखील तुमचा सिनेमा पाहणं गरजेचं असत. २८ एप्रिलला माझा सिनेमा रिलीज झाला आणि ३० एप्रिलपासून मला इंडस्ट्रीतल्या काही लोकांचे फोन यायला सुरुवात झाली. लोक माझ्यावर विश्वास ठेऊ लागले आहेत. त्यामुळे आता माझ्यासाठी गोष्टी बदलताना दिसतात."आईविषयी पहिल्यांदाच झाला व्यक्त
कोणत्याही कार्यक्रमात, "मुलाखतीमध्ये लोक मला फक्त वडिलांविषयीच प्रश्न विचारतात. मात्र, माझ्या आईविषयी फारसं कोणी विचारत नाही. पण, माझी आई त्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्री होती. लोकांच्या नजरेत केवळ माझे वडील येतात. पण, माझी आई आमचं कुटुंब जोडण्याचं काम करते. तिचं आणि माझं खास नातं आहे. मी माझ्या आईला खूप फॉलो करतो. तिचे काही सिनेमाही पाहिलेत. तिने १०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. मला स्क्रीनवर फक्त माझ्या आई-वडिलांची जोडीच पाहायला आवडते. आईसोबत दुसरा कलाकार असेल तर मला आवडत नाही."