Join us

जॅकी-रकुल प्रीतच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 12:04 IST

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात होणार आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यात होणार आहे. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ते लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नासाठी रकुल व जॅकी गोव्यात दाखल झाले आहेत. यासोबतच आता आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुखदेखील गोव्यात पोहोचले आहेत. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

गोव्यातील एअरपोर्टवरून एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये धिरज देशमुख हे पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी पापाराझींना नमस्कार केला आणि त्यांनी चहा-नाश्ता घेतला की नाही, याबद्दल विचारपूस केली. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जॅकी हा धिरज देशमुखांच्या पत्नी दीपशिखा यांचा भाऊ आहे.  जॅकी व दीपशिखा हे दोघेही सख्खे बहिण-भाऊ आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या भव्य लग्न गोव्यातील ITC हॉटेलमध्ये होणार आहे. यासाठी हॉटेलमधील जवळपास ३५ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत; जिथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र राहणार आहेत.  हे हॉटेल ४५ एकरमध्ये बांधले गेले असून, त्यात २४६ खोल्या असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे रकुल आणि जॅकी यांनी आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्यायाचा अवलंब केला आहे.

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या दोघांची लव्हस्टोरी लॉकडाउनमध्ये सुरू झालेली. रकुल आणि जॅकी अनेक वर्षांपासून एकमेकांचे शेजारी होते. मात्र, शेजारी राहूनही दोघं एकमेकांना कधीही भेटले नव्हते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीतील प्रेमात रूपांतर झालं आणि आता या दोघांच्या लग्नासाठी त्यांचे खूपच उत्सुक आहेत.  

टॅग्स :धीरज देशमुखसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमारकुल प्रीत सिंगरितेश देशमुखजॅकी भगनानी