Join us  

राडा तर होणारच...! पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:28 AM

तमाशे बंद करा नाहीतर...अमेय खोपकरांचा थेट इशारा

पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) हिची चर्चा सुरुच आहे. इतकंच नाही तर तिला एका चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिकाही ऑफर झाली आहे. मेरठच्या अमित जानी यांनी तिला ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे ती पाकिस्तानी जासूस असल्याची शंका सरकारला आहे. सीमा हैदरही अभिनेत्री होण्यासाठी तयार आहे मात्र त्याआधी भारत सरकारने तिला क्लीनचीट द्यावी अशी तिने मागणी केली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी १२ ऑगस्टला एक ट्वीट केले होते. मात्र त्यानंतरही या वृत्तांना पूर्णविराम मिळाला नसल्याने त्यांनी 'देशद्रोही निर्माते' म्हणत पुन्हा तेच ट्वीट करुन थेट इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांचं ट्वीट

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकलं नाही तर राडा तर होणारच..!!

आज पुन्हा दिला इशारा-

12 ऑगस्टला केलेले ट्वीट-

आता मनसेच्या इशाऱ्यानंतर निर्माते माघार घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अमित जानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये सीमा हैदर 'कराची टू नोएडा' सिनेमासाठी ऑडिशन देत होती. मात्र हे सर्व नाटक बंद करण्याचा जाहीर इशारा मनसेने दिला आहे. जर हे थांबलं नाही तर धडक कारवाई होईल असा थेट इशाराच मनसेने दिला आहे.

टॅग्स :मनसेपाकिस्तानभारतबॉलिवूड