गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. त्यामुळे म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमार चर्चेत आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले आहे. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे भूषण कुमार अडचणीत सापडला आहे.
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर लाइव्हच्या माध्यमातून भूषण कुमारला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुझ्यावर सुरू असलेले आरोप खरे असले तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे त्याचे नवीन गाणे तात्काळ टी सीरिजच्या युट्यूब चॅनेलवरून काढा. भूषण कुमार तू याला धमकी समज पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तप तुला खूप महागात पडेल.
मात्र अमेय खोपकर यांनी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचे कौतूक केले. म्हणाले की, लॉकडाउनमध्ये सलमानने भाई भाई हे गाणं प्रदर्शित केलं. भाईचारा अबाधित ठेवला.