बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या प्रेग्नेंट पत्नी करीना कपूर आणि मुलगा तैमूरसोबत पटौडी पॅलेसमध्ये वेळ व्यतित करत आहेत. सैफ चौथ्यांदा वडील बनणार आहे. या दरम्यान सैफची मुलगी सारा अली खान ड्रग्स प्रकरणात नाव समोर आले होते. तिची एनसीबीने या प्रकरणी चौकशीदेखील केली. इतकेच नाही तर असेदेखील वृत्त आले की अडचणीत सापडलेल्या आपली मुलगी साराला मदत करण्यासाठी सैफने नकार दिला. सैफने सारा ड्रग्स प्रकरणात अडकली याचा दोष पहिली पत्नी अमृता सिंगला दिला. कारण सैफ-अमृताच्या घटस्फोटानंतर सारा आणि इब्राहिमची जबाबदारी अमृताकडे सोपविण्यात आली. त्यामुळे सैफने फोन करून अमृताला खडेबोल सुनावले होते.
अमृता सिंगचे सैफ अली खानसोबत सुरू असलेल्या भांडणाचे वृत्त मीडियामध्ये आल्यानंतर सैफला ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला होता.या मागचं कारण आहे सैफची पर्सनल लाइफ. जे खूप वादग्रस्त राहिले आहे. सैफ आणि अमृता विभक्त होण्यामागे एका इटालियन मॉडेल कारणीभूत आहे.
सैफने इटालियन मॉडेल रोजा कॅटलानोसाठी पत्नी अमृताला फसविले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता आणि सैफचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण रोजासोबत सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले जात होते.
अमृता आणि सैफचे लग्न तुटल्याचा गंभीर परिणाम सारा व इब्राहिमवर पडला होता. ४ वर्षांचा इब्राहिम सैफला विचारायचा की तुम्ही घरी का येत नाही? त्यावेळी सैफकडे इब्राहिमच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. एका मुलाखतीत सैफने मुलांपासून लांब राहण्याचे दुःख व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की, माझ्या वॉलेटमध्ये माझा मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. त्याचा फोटो पाहिला की मला रडू कोसळते. मला साराचीदेखील आठवण येते. त्यांना भेटण्याची परवानगी मला नाही. त्यांना माझ्याकडे येण्याची परवानगी नाही कारण माझ्या आयुष्यात कुणी नवीन स्त्री होती.