Join us

मोदींची 'ती' सूचना कौतुकास्पद, ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षयकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 7:26 PM

बॉलीवूडमध्ये वाढत असलेल्या बायकॉट ट्रेंडला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना ताकीद दिली आहे

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षयकुमार सुपरस्टार आहे तर इमरान हाश्मी आरटीओ ऑफिसरच्या भूमिकेत आहे. करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात एक बॉलिवूड सुपरस्टार व त्याचा चाहता या दोघांतला राडा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी अक्षयने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बायकॉट किंवा चित्रपट रिलीजसंदर्भात केलेल्या विधानावर अक्षयने मोदींचं कौतुक केलं. तसेच, पंतप्रधान हे देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व आहेत, असेही अक्षय कुमारने म्हटले.  

बॉलीवूडमध्ये वाढत असलेल्या बायकॉट ट्रेंडला अनुसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना ताकीद दिली आहे, कुठल्याही चित्रपट किंवा बॉलिवूड स्टार्स संबंधित सार्वजनिक कमेंट करू नका. यासंदर्भात अक्षयकुमारला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अक्षयने मोदींचं ही सूचना कौतुकास्पद असल्याचं म्ह्टलं. मोदींच्या विधानानंतर बायकॉट ट्रेंडमध्ये बदल दिसून आल्याचं अक्षयला विचारण्यात आलं. त्यावर, जर आपल्या पंतप्रधानांनी असं काही म्हटलं असेल तर ते कौतुकास पात्र आहेत. पंतप्रधान हे देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आहेत, हे मी मानतो. जर त्यांच्या सांगण्यावरुन काही गोष्टी बदलत असतील तर ती आमच्या इंडस्ट्रीजसाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे बदलायलाही हवं कारण आम्हाला खूप काही झेलावं लागतं. 

अगोदर चित्रपट बनवा, त्यानंतर सेंसॉरकडून पास करुन घ्यावा लागतो. त्यानंतर, कोणीतरी काहीतरी बोलतो आणि सगळी गडबड होऊन जाते. आता, पंतप्रधानांच्या बोलण्यानंतर बदल झाला तर चांगलंच, असे अक्षय कुमारने म्हटले.  

टॅग्स :अक्षय कुमारपंतप्रधाननरेंद्र मोदीबॉलिवूडसिनेमा