शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट सिनेमा 'मोहब्बतें'पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री किम शर्माचा जन्म 21 जानेवारी 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. 'तुम से अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'कहता है दिल बार-बार' आणि 'जिंदगी रॉक्स' या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळवता आले नाही. करिअरपेक्षा किम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहिली.
2003 मध्ये किम आणि क्रिकेटर युवराज सिंगच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यांचे जवळजवळ चार वर्षे अफेयर होते, परंतु त्यानंतर त्यांचे रस्ते वेगळे झाले. 2007 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.
त्यानंतर किम शर्माने २०१० मध्ये बिझनेसमन अली पंजानीशी लग्न केले आणि मुंबई सोडली. ती केनियामध्ये स्थायिक झाली. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. किमचे नाव 'रॉक ऑन' चे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि डिझायनर अर्जुन खन्ना यांच्याशीही जोडले गेले आहे.