ते आले जवळ आणि पुन्हा दूर गेले.. त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही होत आहे.बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते मोहित रैना आणि मौनी रॉय.होय आता या कपलचेही ब्रेक अप झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. ऐवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे.मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द मौनीनेच त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. त्यात मौनी सांगितले की, आम्ही आता आधी सारखे मित्र राहिलेले नाही अशी कबुलीच मौनीने दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच मोहितने मी आज अनेक वर्षं इंडस्ट्रीत असलो तरी मॉनी हीच केवळ माझी इंडस्ट्रीमधील सगळ्यात चांगली मैत्रीण असल्याचे म्हटले होते. माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर मी केवळ माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबतच फोटो पोस्ट करतो. त्यामुळे माझ्या अनेक फोटोंमध्ये मौनी असते.
त्यामुळेच मौनी आणि माझे फोटो पाहून आमच्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याची चर्चा नेहमीच रंगते. आम्ही दोघांनी देखील स्वतःच्या मेहनतीवर अभिनयक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आम्ही दोघेही छोट्या शहरातून आलेलो आहोत. तसेच कोणीही गॉड फादर नसताना यश मिळवले आहे. यांसारख्या अनेक गोष्टी आमच्या आयुष्यात सारख्या असल्याने आम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनलो आहोत असे सांगितले होते.
मोहित रॉय आणि मॉनी रॉय यांनी देवो के देव महादेव या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेमधील त्या दोघांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. त्या दोघांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ही मालिका संपल्यानंतर मोहित आणि मॉनीला अनेक वेळा पुरस्कार सोहळ्यात, पार्टीत एकत्र पाहायला मिळाले. तसेच मोहित आणि मॉनी हे दोघेही इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अकाऊंटवर त्यांचे एकत्र फोटो शेअर करायचे मात्र मौनीनेच हे सगळे फोटो डिलीटही केले आहेत.