गतवर्षी १ व २ डिसेंबरला प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी सहजीवनाच्या आणाभाका घेत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे तीन दिवस हा ग्रॅण्ड लग्नसोहळा पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळे रिसेप्शन पार पडलीत. साहजिकच केवळ देशातचं नाही तर जगभर या लग्नाची चर्चा झाली. इतकी की अद्यापही या लग्नाची चर्चा थांबलेल्या नाहीत. या लग्नात प्रियंका व निकच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा मात्र नाराज होत्या. होय, लग्नाच्या इतक्या दिवसांनंतर खुद्द प्रियंकाने याचा खुलासा केला आहे.
प्रियंका चोप्राच्या लग्नात आई मधु चोप्रा का होती नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:42 PM