Join us  

मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 8:51 AM

Deepika Padukone : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दीपिका पादुकोणच्या साडीतल्या लूकने सर्वांना थक्क केले.

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. ५ जुलै रोजी मुंबईत संगीत सोहळा पार पडला, ज्यामध्ये सिनेइंडस्ट्रीतील अनेक स्टार्स दिसले. या इव्हेंटमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते मॉम टू बी दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने. तिने साडीत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. साडीत दीपिका खूपच सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे.

मुंबईतील NMACC येथे आयोजित अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात साडी परिधान करून दीपिका पादुकोणच्या जबरदस्त लूकने थक्क केले. तिच्या बेबी बंपने तिचा लूक आणखीनच आकर्षक बनवला. तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि त्यावर व्हाइट आणि गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती. केसांचा स्लीक बन बांधून तिने लूक पूर्ण केला.

दीपिकाच्या पोस्टवर रणवीरने केली ही कमेंट अंबानींच्या या इव्हेंटमध्ये दीपिका पादुकोण जांभळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान ती तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पोस्ट करताना तिने तिचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंगला टॅग केले आणि लिहिले, आज शुक्रवारची रात्र आहे… त्यामुळे बाळाला पार्टी करायची आहे. रणवीर सिंग. दीपिका पादुकोणने हे फोटो शेअर केल्यानंतर, रणवीर सिंगने कमेंट केली. त्याने लिहिले की, अरे…माझ्या वाढदिवसाची सुंदर भेट, आय लव्ह यू…त्याने लिहिले, हाये.. माझ्या वाढदिवसाची सुंदर भेट! आय लव्ह यू.

रणवीर करतोय ३९वा वाढदिवस साजरारणवीर सिंग ६ जुलै रोजी त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या या पोस्टला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि ८ हजारांहून जास्त चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

दीपिका या महिन्यात देणार बाळाला जन्म  दीपिका पादुकोण २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसली होती. तिने या वर्षी मार्चमध्येच प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले. २०१८ मध्ये दीपिका आणि रणवीरने लग्न केले.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग