Join us

दीपिका प्रेग्नंसीच्या 7व्या महिन्यातही दररोज न चुकता करते हे योगासन, फोटो शेअर करून दिल्या खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 9:39 AM

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण ही अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ती स्वतः ला फिट आणि फाइन ठेवते. यासाठी ती हेल्दी जीवनशैली जगते. दीपिका पादुकोण लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तिला सातवा महिना सुरु आहे. गरोदरपणात स्वतःला फिट ठेवण्यासाठी दीपिका पादुकोण योगाला पसंती देतेय.

गरोदर असताना ॲक्टिव्ह राहावं असं दीपिका पादुकोण म्हणते. त्यासाठीच रोज व्यायाम करणं महत्त्वाचं. हे दीपिका पादुकोण फक्त सांगते असं नाही तर प्रत्यक्षात करतेही.  दीपिका पादुकोणने आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या काही महिन्यातही आपलं वर्कआउट सुरुच ठेवलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती विपरीत करणी हे आसन करताना दिसली. ज्यामध्ये जमिनीवर झोपून दोन्ही पाय काटकोनामध्ये भींतीला टेकवायचे असतात. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे. 

पोस्टमध्ये अभिनेत्रीने या आसनाचे फायदे सांगितले आहे. फोटो शेअर करत तिनं लिहलं, "हा सेल्फ केअर महिना आहे. पण, सेल्फ केअर महिना का साजरा करायचा, जेव्हा आपण रोज काही सोप्या पद्धतींनी स्वतःची काळजी घेऊ शकतो. मला कसरत करायला आवडतं. मी चांगलं दिसण्यासाठी कसरत करत नाही, तर फिट राहण्यासाठी करते. मला जसं कळायला लागलं, तेव्हापासून व्यायाम हा माझ्या जीवनशैलीचा भाग झाला आहे.  वर्कआउट करेल किंवा नाही पण, हा पाच मिनिटांचा हा सोपा व्यायाम मी रोज करते. फ्लाईटनंतर यामुळे मोठा आराम मिळतो'. 

दीपिकाच्या पोस्टवर रणवीरनेही कमेंट करत म्हटले की, "हे जादूप्रमाणे काम करतं". रोजचा व्यायाम हा गरोदरपणात आणि बाळांतपणातल्या आईच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो असं सांगणाऱ्या दीपिका पादुकोणला ॲक्टिव्ह राहाण्यास आवडतं . दीपिका मन शांत ठेवण्यासाठी रोज योगासने करते. यामुळे दीपिकाला खूप प्रसन्न वाटते. गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून  तर फिटनेस वाढवणं हा आहे. यामुळे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही चांगलं राहातं.

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूडरणवीर सिंगयोगासने प्रकार व फायदेसोशल मीडिया