Join us

दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 2:19 PM

दीपिका  लवकरच आई होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. दीपिका  लवकरच आई होणार आहे. दीपिकाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. चाहत्यांना तिच्याशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्यायचं असतं. प्रेग्नन्सीमध्ये दीपिका काय खाते काय नाही, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतंच दीपिकानं एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट दिलं आहे. तसेच तिनं  डाएट या शब्दाबाबत अनेक गैरसमज दूर केलेत. 

दीपिकाच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेढलंय. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट काही खाद्यपदार्थांचा फोटो शेअर केलाय. यात व्हिप्ड क्रिमने सजवलेला पॅनकेक, आईसक्रिमसह ब्राऊनी आणि समोसा पाहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत तिने लिहलं,  'काय? माझ्या फीडवर हा फोटो पाहून सर्प्राईज झालात ना? हो मी मी खाते आणि भरपूर खाते. मला ओळखणाऱ्या कुणालाही ही गोष्ठ तुम्ही विचारू शकता. त्यामुळे तुम्ही इतर काही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका. फीट राहण्याची ट्रीक म्हणजे- समतोल, सुसंगत आणि शरीराचं ऐकून त्याला झेपेल तितकंच खावं'.'.

दीपिकाने पुढे लिहलं, 'डायटबद्दल खुप चुकीच्या धारणा आहेत. अनेकांना वाटतं की, डायट करणं म्हणजे उपाशी राहाणं, कमी खाणं किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, त्या सर्व बळजबरीने खाणं. पण तसं नाहीय. खरंतर, एखाद्या व्यक्तीने एकूण काय खाल्लंय, पिलंय त्याला 'डायट' म्हणतात . हा शब्द ग्रीक भाषेतील 'diaita' वरून घेण्यात आला आहे, ज्याचा अर्थ 'जीवनाचा मार्ग' असा होतो. मी नेहमीच 'संतुलित आहार' घेते आणि हाच जीवनाचा मार्ग' आहे. मी कधीच असा डायट केला नाही ज्यात सातत्य बाळगू शकणार नाही. दीपिकाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

दीपिका ही सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे आणि सप्टेंबरमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. गरोदर असल्याने दीपिका ही सध्या ब्रेकवर आहे, कधीकधी ती इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये किंवा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवते. अलिकडेच ती अनंत अंबानीच्या लग्नात एन्जॉय करताना दिसून आली.  

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमारणवीर सिंग