बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट असणाऱ्या आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक आहे आणि त्यात आमिर व्यतिरिक्त करिना कपूर खान, नागा चैतन्य यांच्या भूमिका आहेत. मेकर्सनी मुख्य कलाकारांना सोडल तर चित्रपटातल्या इतर कलाकरांची नावं गुलदस्त्यातच ठेवली आहेत. अद्याप चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांबद्दल फारशी माहिती समोर आली नसली तरी, चित्रपटाच्या आणखी एका अभिनेत्रीची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्याच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेली मोना सिंग साकारणार आहे.
होय, हे खरे आहे.या चित्रपटात मोना सिंग आमिर खानच्या आईची भूमिका साकारत आहे. मोना सिंग फक्त 40 वर्षांची आहे, तर आमिर खान 56 वर्षांचा आहे. त्यानुसार आमिरच्या आईची भूमिका साकारणारी मोना सिंग आमिरपेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. मोनाने आमिर खानसोबत सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'मध्येही काम केले होते.
एका सूत्राने न्युज पोर्टलला सांगितले की, मोना आणि आमिरमधील वयातील अंतराचा फारसा परिणाम होणार नाही. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात फॉरेस्ट गंपची भूमिका करणारी अभिनेत्री सॅली फील्डची भूमिका मोना सिंग पुन्हा साकारणार आहे.अद्वैत चौहान यांनी 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मोना सिंहने 2003 मध्ये टीव्ही सीरियल ‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘प्यार को हो जाने दो’, ‘कवच: काली शक्तियों से’, ‘कहने को हमसफर हैं’, ‘ये मेरी फॅमिली’ अशा अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले.मात्र ‘जस्सी जैसी कोई नही’ याच मालिकेमुळे मोना घराघरात लोकप्रिय झाली होती. आजही मोनाला जस्सी म्हणूनच चाहे ओळखतात.