Join us  

Monsoon Songs : जाणून घ्या, तुमच्या लाडक्या गायकांची आवडती गाणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2017 1:51 PM

आपल्या आवडत्या ऋतुला रोमँटिक करण्यासाठी काही गाणीही तेवढीच जबाबदार असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक गायक, संगीतकार आहेत ज्यांच्या गाण्यांमुळे आपल्याला पाऊस हवाहवासा वाटू लागला.

अबोली कुलकर्णी रिमझिम पाऊस...मनाला आल्हाददायक वाटणारा गार वारा...गाडीवर लाँग ड्राईव्ह आणि मंजुळ स्वरात कानावर पडणारं पावसाळी गाणं...अहाहा... या पावसाळी ऋतुत रोमँटिक वातावरण अनुभवायला असा कितीसा वेळ लागतो ? पण, आपल्या आवडत्या ऋतुला रोमँटिक करण्यासाठी काही गाणीही तेवढीच जबाबदार असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक गायक, संगीतकार आहेत ज्यांच्या गाण्यांमुळे आपल्याला पाऊस हवाहवासा वाटू लागला. पाहूयात, अशाच काही गायकांची आवडती गाणी.. त्यांच्याच शब्दांत...* शाल्मली खोलगडे ‘जब हॅरी मेट सेजल’ मधील ‘सफर’ हे गाणं मला या पावसाळा ऋतुत ऐकायला बेहद आवडतं. ड्रायव्हिंग करत असताना गाण्यातील प्रत्येक क्षण अनुभवयाला मला आवडतं. मला गाण्यातील मधुरता आवडते. मी ज्या रस्त्यावरून जात आहे तो रस्ता कधीही संपू नये, अशी माझी इच्छा असते.* जोनिता गांधीपाऊस पडतोय आणि आपण लाँग ड्राईव्हवर जातोय. अशावेळी खिडकीबाहेर डोकावताना सुरू असलेल्या गाण्याचे बोल इमॅजिन करण्यात जी काही मजा आहे, ती शब्दांत सांगणं कठीण. मला या ऋतुत ‘ओ साथी रे’ (ओमकारा) आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ (मीनाक्षी) ही गाणी ऐकायला आवडतात.* सोफी चौधरीएका गायकासाठी त्याच्या आवडीचं एक गाणं सांगणं अत्यंत कठीण असतं. मला असं वाटतं की, माझ्या आवडीची दोन गाणी आहेत.‘भीगी भीगी रातों मैं...’ हे पंचमदा यांचं गाणं आणि ‘टिप टिप बरसा पानी’ हे एव्हरग्रीन गाणं म्हणजे माझ्यासाठी आनंदच...* तन्वी शाहमॅडोना यांची पावसाची गाणी आणि ‘लम्हे’ मधील ‘मेघा रे मेघा रे’ ही दोन गाणी माझ्या हृदयाजवळची आहेत. मॅडोनाचे गाणे यासाठी की, ते मी माझ्या नानीसोबत पहिल्यांदा ऐकलं होतं. ते देखील गरमागरम चहा आणि चटपटीत समोस्यांसोबत..* तुलसी कुमारमला पावसाळी ऋतुच प्रचंड आवडतो. त्यात मला आवडणारं  गाणं म्हणजे ‘रिमझिम गिरे सावन’ हे लताजी आणि किशोरदा यांनी गायलेलं गाणं म्हणजे स्वर्गच. तर दुसरे ‘रिमझिम रिमझिम, रूमझूम रूमझूम भिगी भिगी रूत मैं’ हे ‘१९४२ : अ लव्हस्टोरी’ मधील गाण्याच्या मी प्रेमात आहे. त्याशिवाय ‘मोहरा’ मधील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणंही मला तेवढंच मोहात पाडतं. * मोनिका डोगरा ए.आर. रहमान यांची पावसाची गाणी मला आवडतात. या गाण्यामधील माधुर्य आणि जिवंतपणा हा खुप भावतो. रहमानजी माझे ‘आॅल टाइम ’ फेव्हरेट आहेत. * मयांग चँग‘बर्फी’ चित्रपटातलं ‘फिर ले आया दिल’ हे गाणं मला माझं रेनी साँग वाटतं. पावसाच्या दिवसात मला या गाण्याचा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल. * पावनी पांडे ‘घनन घनन ’,‘बरसों रे मेघा ’ आणि ‘भीगी भीगी रातों मैं’ ही गाणी माझी सर्वांत आवडती गाणी आहेत. या गाण्यांना पावसाळी ऋतुचा परफेक्ट फ्लेव्हर मिळालेला आहे. * आकृती कक्कड नुसरत फतेह अली खान आणि मायकेल ब्रूक यांनी गायलेलं नाईट साँग ‘माय हार्ट माय लाईफ’ हे गाणं खुप आवडीचं. हे गाणं मला माझ्या कल्पनेतील गावी घेऊन जातं. ‘तु मेरा दिल, तू मेरी जान’ हे गाणं वेगवेगळया अंदाजात ऐकायलाही मला खूप आवडतं.