Join us

लेक आराध्यासह ऐशच्या जीवनातील सर्वांत सुंदर क्षण, मायलेकींचा पूलमध्ये दिसला ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 1:37 PM

ऐश्वर्या आराध्यासोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते. हा फोटो शेयर करत अभिषेकने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

सध्या ऐश्वर्या पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासह मालदीव्हजमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. बिझी शेड्युअलमध्ये एकमेकांना वेळे देणं आणि त्याची सांगड घालणं दोघांसाठी तितकंसं सोपं राहिलेलं नाही. मात्र तरी जीवनातील काही विशेष प्रसंगी एकमेकांसाठी वेळ राखून ठेवतात. ऐश -अभिषेकच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. लग्नाच्या पहिल्याअॅनिव्हर्सरी पासून आज पर्यंत दोघांनी आपला हा दिवस खास करण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग करत सेलिब्रेशन केले. 

आता तर लग्नाचा 12 वा वाढदिवस होता त्यामुळे  खास बनवण्यासाठी ऐश्वर्याने मालदीव्हजची निवड केली होती. ऐश-अभिचे व्हॅकेशनचे फोटोज सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत. यात एक फोटो सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या आराध्यासोबत पूलमध्ये  एन्जॉय करताना दिसते. हा फोटो शेयर करत अभिषेकने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. त्याने लिहीले आहे की, 'हॅप्पीनेस...माय गर्ल्स.'

सा-या दुनियेला ऐश्वर्याच्या सौंदर्याने वेड लावलं होतं.. कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी बनण्याचा बहुमानही तिला लाभला.. असा गौरव प्राप्त झालेली ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. खरं तर ऐश्वर्या राय आणि अभिषेकसाठी 2007 हे वर्ष खास होतं. कारण जानेवारी महिन्यात दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'गुरु' रुपेरी पडद्यावर झळकला.

 

रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांची एन्गेजमेंटही झाली होती. 'गुरु'च्या सुपरडुपर यशानंतर ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले. उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं आणि ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन.

लग्नाच्या 4 वर्षांनंतर  नोव्हेंबर 2011 मध्ये मुलगी आराध्याचा जन्म झाला होता. चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झाली. त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं.

 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन