Join us

हे चित्रपट कधीच पाहू नका आपल्या कुटुंबियांसोबत, हे आहेत प्रचंड बोल्ड चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 8:15 PM

बोल्ड कटेंटमुळे ॲडल्ड हे सर्टिफिकेट मिळालेले चित्रपट टिव्हीवर लागलेले असले तर कुटुंबासोबत पाहाताना आपल्यालाच थोडेसे अवघडल्यासारखे होते.

ठळक मुद्देमर्डर या चित्रपटाच्या कथेपेक्षा अथवा कलाकारांच्या अभिनयापेक्षा या चित्रपटातील बोल्ड दृश्यांचीच अधिक चर्चा झाली होती.

बॉलिवूडमधील काही चित्रपट हे बोल्डनेसच्या बाबतीच हॉलिवूड चित्रपटांना देखील टक्कर देतात. त्यामुळे हे चित्रपट तुमच्या कुटुंबियांसोबत पाहाताना दहा वेळा तर विचार करणे गरजेचे आहे. बोल्ड कटेंटमुळे ॲडल्ड हे सर्टिफिकेट मिळालेले चित्रपट टिव्हीवर लागलेले असले तर कुटुंबासोबत पाहाताना आपल्यालाच थोडेसे अवघडल्यासारखे होते. या चित्रपटातील बोल्ड दृश्य, शिव्या यांमुळे हे चित्रपट कुटुंबियांसोबत पाहाणे नक्कीच टाळलेले बरे.

हेट स्टोरी या चित्रपटाच्या चारही सिझन बोल्ड कंटेटमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटात सेक्स सीनचा अक्षरशः भडिमार आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

गर्लफ्रेंड हा चित्रपट त्या काळात चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटात दोन मुलींची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील नायिकांवर काही बोल्ड दृश्यं देखील चित्रीत करण्यात आली आहेत.

हेट स्टोरी या चित्रपटाच्या सगळ्याच भागांची बोल्ड दृश्यांमुळे चर्चा झाली होती.

जिस्म २ मध्ये सनी लियोनी आणि अरुणोदय सिंह यांनी अनेक बोल्ड दृश्यं दिली आहेत.

जिस्म या चित्रपटाच्या पहिल्या भागात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील हॉट सीनची प्रचंड चर्चा रंगली होती.

ज्युली २ हा एक थ्रिलर चित्रपट होता. राय लक्ष्मीचा हा पहिलाच चित्रपट होता. या पहिल्याच चित्रपटात तिने अनेक बोल्ड दृश्यं दिली होती.

मर्डर या चित्रपटाच्या कथेपेक्षा अथवा कलाकारांच्या अभिनयापेक्षा या चित्रपटातील बोल्ड दृश्यांचीच अधिक चर्चा झाली होती.

सेक्सचा शौकीन असलेल्या एका मुलाची कथा प्रेक्षकांना हंटर या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ब्ल्यू फिल्म पाहाणे, तरुणींचा पाठलाग करणे, महिलांसोबत संबंध ठेवणे या तरुणाच्या आवडत्या गोष्टी असतात. या चित्रपटात गुलशन देवैय्या, राधिका आपटे, सई ताम्हणकर आणि वीरा सक्सेना यांच्या मुख्य भूमिका होत्या.