अमिताभ बच्चन यांना सर्वाधिक पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2016 10:03 PM
‘पिकू’ या चित्रपटाद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून अमिताभ बच्चन यांनी आणखी एक विक्रम केला आहे. त्यांनी आतापर्यंत चार राष्टÑीय ...
‘पिकू’ या चित्रपटाद्वारे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून अमिताभ बच्चन यांनी आणखी एक विक्रम केला आहे. त्यांनी आतापर्यंत चार राष्टÑीय पुरस्कार मिळविले आहेत. आतापर्यंत कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याने इतके पुरस्कार मिळविलेले नाहीत. दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनाही आतापर्यंत चार राष्टÑीय पुरस्कार मिळाले आहेत.सर्वाधिक राष्टÑीय पुरस्कार मिळविणाºयांमध्ये चित्रपट जगतामधील महान दिग्दर्शक सत्यजित रे यांचा समावेश आहे. त्यांना विविध श्रेणीमध्ये ३२ वेळा राष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. यापैकी ६ पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मिळाले आहेत. अदूर गोपालकृष्णन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पाच वेळा राष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शबाना आझमी यांना पाच वेळा राष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. १९७५ साली पहिल्यांदा श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ या चित्रपटासाठी शबाना आझमी यांना राष्टÑीय पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’ चित्रपटाद्वारे त्यांना दुसरा पुरस्कार मिळाला. १९८४ साली ‘कांधार’ या चित्रपटासाठी तिसरा, १९८५ साली ‘पार’ या चित्रपटासाठी चौथा राष्टÑीय पुरस्कार शबाना यांना मिळाला. सलग तीन वर्षे राष्टÑीय पुरस्कार मिळवून हॅट्ट्रिक साधणाºया त्या एकमेव अभिनेत्री आहेत. शबानाजींना १९९९ साली ‘गॉडमदर’ या चित्रपटासाठी पाचव्यांदा पुरस्कार मिळाला. शबानाजींचे पती जावेद अख्तर हे देखील मागे नाहीत. आतापर्यंत पाच वेळा राष्टÑीय पुरस्कार मिळवून सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे गीतकार बनण्याचा मान त्यांच्याकडे जातो. दाक्षिणात्य गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी सात राष्टÑीय पुरस्कार मिळविले आहेत. गायकांमधील हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. गायिकांमध्ये ६ पुरस्कारासह के. सी. चित्रा यांनी विक्रम केला आहे.