बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मदर्स डे साजरा करीत एक प्रेमळ आणि भावूक संदेश दिला आहे. त्यांनी हा भावूक संदेश एका गाण्याच्या माध्यमातून दिला आहे. त्यांनी त्यांची आई तेजी बच्चन यांच्या आठवणीत हे गाणे गायले आहे. या गाण्याचे नाव आहे मां. या गाण्याला बिग बींनी यजत गर्ग यांच्यासोबत स्वरसाज दिला आहे.
मां या गाण्याच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुंदर शब्द शैलीच्या माध्यमातून आपल्या आईंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातून दुःख आणि ते आपल्या आईला किती मिस करत आहेत, हेदेखील जाणवते आहे. या गाण्याचे बोल आहेत 'मेरी रोटी की गोलाई मां, मेरे सच की सब सच्चाई मां...'डर लगता है जब रोती है मां..’. हे बोल ऐकून आपणही भावूक होऊन जातो.
या गाण्याची निर्मिती चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांच्यासह करण्यात आली असून संगीत अनुज गर्ग यांनी दिले आहे. तर गाण्याची रचना पुनीत शर्माने केली आहे.
अमिताभ बच्चन उयरंथा मनिथम या चित्रपटाद्वारे तमीळ चित्रपटसृष्टीत एंट्री करत असून या चित्रपटाची निर्मिती एसजी सुरयाँ यांनी केली आहे तर या चित्रपटाचे लेखन जवार सीथारामण यांनी केले असून या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश्नन-पंजू यांनी केले आहे.
या चित्रपटात अमिताभ यांची जोडी राम्या क्रिश्नन यांच्यासोबत जमली असून राम्याला बाहुबली या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.