Join us

लव्ह यू माँ...!! बॉलिवूड सेलिब्रिटींनी असा साजरा केला ‘मदर्स डे’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:16 AM

‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर . म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन ज्या ठिकाणी होते  ती म्हणजे आई.... 

‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर . म्हणजेच आत्मा आणि ईश्वर यांचे मिलन ज्या ठिकाणी होते  ती म्हणजे आई. गर्भात 9 महिने सांभाळणारी आई, जन्मानंतर आपल्याला भरवणारी, बोट धरून चालायला शिकवणारी, आपल्यासाठी रात्र रात्र जागणारी, आपल्यासाठी राबणारी, आपला हट्ट पुरवणारी अशी एक ना अनेक आईची किती रूप सांगावीत. आज याच माऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. होय, आज मदर्स डे. जगभरात मदर्स साजरा होत असताना बॉलिवूडकरांनीही यानिमित्ताने आपल्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन एक सुंदर संदेश दिला आहे.

मदर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्री कंगना राणौतने आईसाठी एक सुंदर कविता लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री सारा अली खानने आई अमृता सिंग व नानी रूखसाना सुल्ताना यांचा (आईची आई) फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 अभिनेता विकी कौशलने  लहानपणीचा फोटो शेअर करत मदर्स डे साजरा केला आहे़ या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे.  

अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या लहानपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनन्याचे वडील चंकी पांडे तिला विचारतात की जगात तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते, तर त्यावर ती पटकन आईचे नाव घेताना दिसतेय.

 अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एक मोनोलॉग शेअर केला आहे. एका आईला मुलांकडून काही अपेक्षा असतात पण ती सांगू शकत नाही.यावेळी तिच्या मनाची अवस्था तिने वर्णन केली आहे.

 

टॅग्स :मदर्स डेबॉलिवूड