Mouni Roy: छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या चर्चेत आहे. मौनी रॉय ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळालं आहे. मौनीचा नवा आवतार पाहून तिनं प्लास्टिक सर्जरी (Plastic surgery) केल्याचे दावे सोशल मीडियावर नेटकरी करत आहेत. अशातच आता मौनी रॉयनं खुद्द प्लास्टिक सर्जरीसंदर्भातील कमेंट्सला प्रत्युत्तर दिलं आहे.
मौनी काही दिवसांपुर्वी तिच्या आगामी 'भूतनी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमातील तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. यात तिचा चेहरा बदललेला दिसला. यानंतर नेटकऱ्यांनी लगेल मौनीला पुन्हा सर्जरी केली आहे का, असे प्रश्न करायला सुरुवात केली. अनेकांनी तिला ट्रोलही केलं. यानंतर मुंबईत एका कार्यक्रमात मौनीनं ट्रोलिंगवर मौनं सोडलं.
मौनी प्रतिक्रिया देताना प्लास्टिक सर्जरीबाबत म्हणाली, "मला पर्वा नाही. सर्वांनी आपलं आपलं काम करावं. त्या लोकांना जर तुम्ही पडद्यामागे बसून ट्रोल करायला आवडत असेल, त्यात आनंद मिळत असेल, तर करु द्या", असं म्हटलं. मौनीच्या उत्तरावरुन ट्रोलिंगचा तिला काहीही फरक पडत नसल्याचं दिसलं.
मौनी रॉय लवकरच 'भूतनी' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्या पात्राचं नाव मोहब्बत असं आहे. या चित्रपटात अभिनेत्री व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, पलक तिवारी, सनी सिंग, ब्युनिक आणि आसिफ खान हे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.