Join us

मौनी रॉयच्या घरी वाजणार सनईचौघडे; जानेवारीमध्ये करणार प्रियकरासोबत लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 16:35 IST

Mouni roy: गेल्या काही काळापासून मौनी, सूरज नांबियारला (Suraj Nambiar) डेट करत असून याच्यासोबतच ती लग्नगाठ बांधणार आहे.

ठळक मुद्देमौनीच्या प्रियकराचं नाव सूरज नांबियार असं असून तो एक बॅकर आहे.

कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. काही महिन्यांपूर्वीच कलाविश्वातील अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर आता लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी 'इंडिया टुडे'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या काही काळापासून मौनी, सूरज नांबियारला (Suraj Nambiar) डेट करत असून याच्यासोबतच ती लग्नगाठ बांधणार आहे. याविषयीचा खुलासा मौनीच्या भावाने विद्युत रॉयसरकरने केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे मौनी आणि सूरज नेमकं कोणत्या महिन्यात लग्न करणार हेदेखील विद्युतने सांगितलं आहे.

Bigg boss marathi 3: हल्लाबोल! महिला सदस्यांवर कचरा फेकल्यामुळे तृप्ती देसाई ट्रोल

काही महिन्यांपूर्वीच मौनीने सूरजच्या कुटुंबीयांसोबत एक फोटो शेअर केला होता. यावेळी सूरजच्या आई-वडिलांना तिने मॉम-डॅड असं संबोधलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आता मौनीच्या भावानेच या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. मौनी आणि सूरजच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून येत्या जानेवारी महिन्यात ही जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

कोण आहे सूरज नांबियार?

मौनीच्या प्रियकराचं नाव सूरज नांबियार असं असून तो एक बॅकर आहे. मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :मौनी राॅयसेलिब्रिटीबॉलिवूड